आघाडीला धक्का; राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा माघार घेण्यास नकार

महामंडळ देण्याचे आश्वासनही देण्यात आले
NCP, Congress
NCP, Congresssarkarnama

नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी नरखेड तालुक्यातील सावरगाव सर्कलच्या अंजली शिंदे आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातील बोथिया-पालोरा सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अधिकृत उमेदवार नकुल बरबटे यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला आहे. (NCP candidate refuses to withdraw from elections)

NCP, Congress
मोठी बातमी : भावना गवळींवर अटकेची टांगती तलवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश शिंदे यांच्या पत्नी अंजली शिंदे यांनी सावरगावमध्ये बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांचा सामना राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार देवकाबाई बोडखे यांच्याशी होणार आहे. याशिवाय पार्वताबाई काळबांडे भाजप आणि ललिता खोडे या शिवसेनेच्या उमेदवारही रिंगणात आहेत. शिंदे यांनी माघार घ्यावी यासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते. प्राप्त माहितीनुसार सतीश शिंदे यांच्याशी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मुंबईतून संपर्क साधला. त्यांना महामंडळ देण्याचे आश्वासनही देण्यात आले. मध्यंतरी त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत बोलावून घेतले होते. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कुठलाही निर्णय घेताना विश्वासात घेत नसल्याने शिंदे यांनी कुठल्याही परिस्थिती निवडणूक जिंकून दाखवण्याचे आव्हान स्वीकारल्याचे कळते.

NCP, Congress
अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर; म्हणाले, मी चुकीचे काही केले नाही

रामटेकमध्ये राजीनाम्याची धमकी

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना बोथिया- पालोरा जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादीच्या नकुल बरबटे यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांना राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारीसुद्धा दिली होती. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला होता. दगाफटका होऊ नये याकरिता राष्ट्रवादीची उमेदवारी दबावतंत्राचा भाग होती. मात्र वरून दबाव आल्याने सोमवारी दिवसभर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माघारीसाठी प्रयत्न केले. मात्र, उमेदवार बरबटे यांनी फोन बंद करून ठेवला होता. ते उमेदवारी मागे घेण्याची वेळ संपल्यावरच समोर आले. विशेष म्हणजे बरबटे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यास दबाव टाकल्यास रामटेक तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची धमकी दिल्याचे कळते.

शिंदे आणि बरबटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. रामटेकचा उमेदवार दिवसभर ऑऊट ऑफ कव्हरेज होता. त्याच्या घरीसुद्धा आपण जाऊन आलो. रामटेक राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आमचा नाइलाज झाला. शिंदे यांचीही समजूत काढण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र त्यांनी आधीच निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. असे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com