मुंबई : भाजप नेते खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यवतमाळ-वाशीमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची (Bhawana Gawali) ईडीकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढच होत आहे. भावना गवळी यांच्या कंपनीचे संचालक सईद खान यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आता गवळी यांनाही ईडी अटक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Shiv Sena MP Bhavana Gawli likely to be arrested)
भावना गवळी यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. गवळी यांचे इंद्रपाल यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहीत आहे. भावना गवळी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महिला उत्कर्ष ट्रस्ट चे कंपनीत रूपांतर करून गैरव्यवहार केल्याचार आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात खासदार गवळींना गैरप्रकार केला असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. ट्रस्टच्या मालकीची ७० कोटींची संपत्ती खासदार गवळींनी त्यांच्या पीएच्या नावावर केली असल्याचा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. ईडीने गवळी यांच्या संस्थांवर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर सईद खान यांना अटक केली आहे. आता गवळी यांनाच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातले आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. भावना गवळी लवकरच तुरुंगात जातील, असा दावा सोमय्यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.
रिसोडनजीकच्या देगाव येथे खासदार गवळी यांचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना आणि भावना पब्लिक स्कूल व डीएमएलटी कॉलेज आहे. तर शिरपूरला वरिष्ठ महाविद्यालय आहे. या सर्वच ठिकाणी ईडीने छापे घातले. बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये निश्चितच काहीतरी गौडबंगाल आहे. पण शाळा आणि महाविद्यालयांत तसे काहीही नसल्याचे शिवसैनिक सांगत आहे. केंद्रातील भाजप सरकार ईडीचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोपही शिवसैनिक करीत आहेत. असे असले तरी ईडी कसून चौकशी करीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.