Praful Patel advice to Rohit Pawar प्रफुल्ल पटेलांचा सल्ला रोहित पवार ऐकणार का ? ; अजितदादांना शुभेच्छा देणार का ?

Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पटेल हे पहिल्यांदाच गोंदिया येथे आले आहेत.
Praful Patel advice to Rohit Pawar
Praful Patel advice to Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

NCP News :राष्ट्रवादी फुटून दोन गट पडले, पक्षावर दावे करताना पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. थोरल्या पवारांकडून रोहित पवार लढले, अजितदादांकडून दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल रोहित पवारांना तोंड देत राहिले. तरीही रोहित पवार कोणाला सोडत नव्हते. त्यातून वाद चिघळण्याच्या शक्यता वाढल्या. त्यात याच रोहित पवारांना पटेलांनी सल्ला दिला आहे.

Praful Patel advice to Rohit Pawar
Rohit Pawar Video Goes Viral : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून रोहित पवारांचा Video होतोय व्हायरल : काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत टि्वट केलं. या टि्वटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की..! लवकरच अजितपर्व…”, असं मिटकरींनी या टि्वटमध्ये म्हटलं होते.

त्यानंतर अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विविध पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. त्यावर चर्चाही रंगताहेत. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार Jरोहित पवारांनीही "अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर मी त्यांच्या स्वागत करेल" असे वक्तव्य केले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना सल्ला दिला आहे. पटेल सध्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पटेल हे पहिल्यांदाच गोंदिया येथे आले आहेत.

Praful Patel advice to Rohit Pawar
Maharashtra Monsoon Session : गडचिरोलीच्या आमदाराचा अजब दावा ; 'विकास झाला, आता निधी नको ' ; आदिवासी विद्यार्थी आक्रमक..

प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवारांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानावर प्रश्न विचारला होता. त्यावर पटेल म्हणाले, "रोहित पवारांनी अजित पवार यांनी जे पाऊल उचलले आहे त्याचे देखील स्वागत करायला पाहिजे अशी त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे."

राष्ट्रवादी काँग्रेस सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर शपथपत्र भरून घेण्यात येत आहे. याबाबत पटेल म्हणाले, "हा एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे आणि भविष्यात याचा फायदा राष्ट्रवादीला होण्यासाठी सध्या अजितदादा गटाकडून कार्यकर्त्यांकडून शपथ पत्र भरून घेण्याचा काम हे सुरू आहे,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com