NCP Nagpur News : नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर; एकच सवाल, महापुरुषांचे पुतळे का हटवले?

Nagpur : अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्याचं काय कारण?
NCP Agitation in Nagpur
NCP Agitation in NagpurSarkarnama

Nagpur NCP Agitation News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा तात्पुरता स्वरूपात हटवण्यात आला. याचा विरोध करण्यासाठी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज (ता. ३१ मे) रोजी कॉटन मार्केट चौकात आंदोलन केले. (The statue of Ahilya Devi Holkar was temporarily removed)

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप-शिंदे सरकारच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. सावरकरांच्या जयंतीचा कार्यक्रम करण्याला कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. पण सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्याचं काय कारण, असा सवाल पेठे यांनी केला.

या कृतीमुळे यांच्या मनात या दोन कर्तबगार स्त्रियांबद्दल किती आदर आहे, ते सगळ्या महाराष्ट्राला कळले आहे. सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनामध्ये ईश्वर बाळबुद्धे, अविनाश काकडे, श्रीकांत घोगरे, लक्ष्मी सावरकर, नूतन रेवतकर, शैलेंद्र तिवारी, संतोष सिंह, शिव बेंडे, महेंद्र भांगे, सुखदेव वंजारी, रिजवान अंसारी,राजा बेग, अरविंद भाजीपाले आदी सहभागी झाले होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 'इंडिक टेल्स' या वेबसाइटनं आक्षेपार्ह लिखाण केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र निषेध केला आहे. त्याचाही विरोध करण्यात आला. काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करण्याचे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. आता पुन्हा सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त लिखाण करण्यात आले आहे.

NCP Agitation in Nagpur
Sakal-Saam Survey : BJP - Eknath Shinde'साठी धोक्याची घंटा | NCP | Congress | Shivsena | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिवशी महाराष्ट्र (Maharashtra) सदनात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमांच्या निमित्ताने येथील काही पुतळे हटविण्यात आले, यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला (State Government) जाब विचारला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com