Chandrashekhar Bawankule and Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule and Sharad PawarSarkarnama

NCP News : राष्ट्रवादीत पुन्हा महानाट्य होईल आणि त्याचा शेवट शरद पवार करतील, बावनकुळेंचं भाकीत !

Bawankule's Prediction On Sharad Pawar: पवारांनी तेव्हाच अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कार्यकारी अध्यक्ष नेमायचं होतं.
Published on

Chandrasekhar Bawankule's Comment on Nationalist Congress : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाची मागणी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच नाही तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. तेव्हापासून विविध चर्चांना उधाण आले आहे. आज (ता. २२) सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे भाकीत केले आहे. (I said only when Sharad Pawar resigned)

यासंदर्भात बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हाच मी सांगितले होते की, हे घरगुती नाटक आहे. तेव्हाच शरद पवारांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कार्यकारी अध्यक्ष नेमायचं होतं. पण त्यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांना नेमलं. तेव्हाच त्यांच्यात आलबेल नाही हे स्पष्ट झालं होतं.

महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी विरोधी आहे. त्यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात काहीही वाव नाही. त्यांच्याकडे असलेले मोठे ओबीसी नेते आता भाजपमध्ये येत आहेत. येत्या रविवारी पूर्व विदर्भावर मोठा प्रभाव असणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Chandrashekhar Bawankule and Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule News : त्यांना देशाची नाही, तर मुलाबाळांची चिंता; त्यासाठीच आज पाटण्यातील बैठक !

ओबीसी नेते राष्ट्रवादी सोडून जात आहेत, म्हणून त्यांच्या पक्षात ओबीसी प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी पुढे आली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा महानाट्य होईल आणि त्याचा शेवट शरद पवार करतील, असे म्हणत बावनकुळेंनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.

भाजपमध्ये (BJP) मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. बंजारा समाजातील १० हजार पेक्षा जास्त लोक आमच्याकडे आतापर्यत आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील मोठं प्रस्थ, ओबीसी नेते आणि चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे आणि ज्यांनी २०१९च्या निवडणुकीमध्ये मनसेच्या तिकीटावर २५ हजारांहून अधिक मते घेतली ते राजूरकर रविवारी चंद्रपूरमध्ये भाजपमध्ये हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश घेणार आहेत, असेही बावनकुळेंनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule and Sharad Pawar
Atul Bhosle'ना उमेदवारी? बावनकुळे स्पष्टच बोलले | Bawankule | Udayanraje | Shivendraraje

कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षाची किंमत काय?

काँग्रेस (Congress) हे बुडतं जहाज आहे. आपसी वादातच ते संपणार आहेत. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांना निलंबित केलं आणि केंद्रातील त्यांच्या नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला स्थगिती दिली. पक्षाची कार्यपद्धतीनुसार कार्यवाही न केल्याचा ठपका प्रदेशाध्यक्षांवर ठेवण्यात आला. यावरून प्रदेशाध्यक्षाला त्यांच्या पक्षात काय किंमत आहे, हे दिसून आले, असे म्हणत आमदार बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) नाव न घेता पटोलेंवर निशाणा साधला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com