Chhagan Bhujbal has demanded to give post for OBC community : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी भाकरी फिरवल्यानंतर वेगाने घटना घडत आहेत. त्या दिवसानंतर अजित पवार नाराज असल्याची कुजबुज सुरू झाली. ती अजित दादांच्या कालच्या मागणीनंतर जवळपास स्पष्ट झाली आहे. तर आज ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी पद द्यावे, अशी मागणी केली आहे. (Jayant Patil has completed five years on the post of state president)
छगन भुजबळ आज (ता. २२) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावर एका समाजाचा व्यक्ती असेल, तर प्रदेशाध्यक्षपदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. सद्यःस्थितीत विरोधी पक्ष नेते अजित पवार असल्याने प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाच्या नेत्याला संधी द्यावी, असे म्हणत छगन भुजबळांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला असल्याचे मानले जात आहे.
तसेही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होते आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावर पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. पक्षात संघटनेच्या निवडणुका सुरू असताना अध्यक्ष बदलण्याची मागणी झाली आहे, यात वावगे काही नाही, असे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे मत आहे.
शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा जयंत पाटील सर्वाधिक भावुक झाले होते. गेल्या पाच वर्षांपासून ते प्रदेशाध्यक्षपदावर आहे. आता शरद पवार पुन्हा भाकरी फिरवतील, असा अंदाज व्यक्त होतो आहे. त्यावरून काल अजित पवार आणि आज छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला आहे.
राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावर एका समाजाचा व्यक्ती असेल, तर प्रदेशाध्यक्षपदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी, अशी मागणी आम्ही केली आहे. म्हणजे ही आमची सूचना आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. एकंदरीतच काय तर प्रदेशाध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत रेस सुरू झाली आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजित पवारांनी (Ajit Pawar) काल सुतोवाच केले, यावर आमचा पक्ष लोकशाहीने चालणार पक्ष आहे. त्यात प्रत्येक जण आपले मत व्यक्त करतात. अजित दादांना असे वाटले असेल की आपण नेहमी विधान मंडळात काम करतो. पक्षात जबाबदारी मिळाली तर अधिक चांगले काम करू शकतो, असे त्यांना असे वाटले असेल. त्यावरून त्यांनी आपले मत व्यक्त केले. पण जे काही निर्णय घ्यायचे ते शरद पवारांनी (Sharad Pawar) घ्यायचे, असेही भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.