NCP's Strategy News : महाविकास आघाडीत भंडारा-गोंदिया मिळावा, यासाठी राष्ट्रवादीची ‘ही’ स्ट्रॅटीजी !

Bhandara-Gondia : आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही भंडारा-गोंदियावर लक्ष केंद्रित केले आहे.
NCP, Bhandara-Gondia
NCP, Bhandara-GondiaSarkarnama
Published on
Updated on

NCP's Strategy For Ramtek Lok Sabha Constituency : भाजपने भंडारा-गोंदियाकडे लोकसभा मतदारसंघाकडे फोकस केला आहे. सद्यःस्थितीत तेथे चार ते पाच नावांवर श्रेष्ठींचा विचारविमर्श सुरू आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही भंडारा-गोंदियावर लक्ष केंद्रित केले आहे. पण यामागे त्यांची वेगळीच स्ट्रॅटीजी असल्याचे चित्र दिसत आहे. (It seems that they have a different strategy)

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा केला जाणार आहे. या संदर्भात सोमवारी (ता. ५) मुंबई येथे आयोजित बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांना सर्व डेटा घेऊन बोलावण्यात आले आहे. या जागेवरून दोन्ही काँग्रेसमध्ये बिनसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. काँग्रेसने आजपासूनच लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांना प्रारंभ केला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची चर्चा सुरू आहे. त्यानुसार जागा वाटपांचा फॉर्म्‍यूला ठरवण्याच्या चर्चा सुरू आहेत. मध्यंतरी तीनही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढाव्या असा प्रस्ताव समोर आला होता. मात्र या आकड्यावर कोणाची संमती होण्याची शक्यता दिसत नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. स्थानिक राजकीय परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी १९ जागा मागितल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे.

NCP, Bhandara-Gondia
हे आहे Sharad Pawar आणि Gautam Adani भेटीचं कारण | NCP | Ekanth Shinde | Elections 2024 | Sarkarnama

पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार नाही. गोंदिया-भंडाऱ्यात माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यापूर्वी निवडून आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यानंतर नाना यांनी हा मतदारसंघ सोडून नागपूरमध्ये धाव घेतली होती. येथे पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या साकोली विधानसभा मतदारसंघात परतले आहेत.

प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर आहेत. ते या जागेवर दावा करण्याची दाट शक्यता आहे. पटोले याच जिल्ह्याचे असल्याने ते सहजासहजी ही जागा सोडणार नाहीत. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून रामटेक लोकसभा जागेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केली जाणार आहे. रामटेक लोकसभेमधील काटोल-नरखेड आणि हिंगणा असे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचे वर्चस्व आहे.

NCP, Bhandara-Gondia
Nagpur NCP News : एरवी शांत असलेले राष्ट्रवादीचे नेते महावितरणच्या विरोधात झाले आक्रमक !

माजी मंत्री रमेश बंग, काही जिल्हा परिषद (ZP) सदस्यही या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे (NCP) आहेत. त्यामुळे इतर जागांच्या तुलनेत रामटेक (Ramtek) लढणे सोयीचे असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे गोंदिया-भंडारा मिळावा, याकरिता ही राष्ट्रवादीची स्ट्रॅटीजी असल्याचे बोलले जात आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com