Neelam Gorhe News: सभागृहात लक्षवेधी लावा किंवा लावू नका, हे सांगायला कुणी येऊ नये, निलम गोऱ्हेंनी खडसावले !

MLA : एका आमदाराचाही समावेश होता.
Neelam Gorhe
Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Legislative Councils News: आज विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना काही लोक विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या दालनात त्यांना भेटायला गेले. त्यात एका आमदाराचाही समावेश होता. त्यांच्यावर अन्याय झाल्याचे ते सांगत होते. यावर निलम गोऱ्हेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अशा प्रकारे कुणीही भेटायला येऊ नये, असे सभागृहात आमदारांना खडसावले. (Some people went to meet Neelam Gorhe's hall)

सभागृहाचे कामकाज सुरू असताना अशी कृती योग्य नाही. एखादी लक्षवेधी लावावी की लावू नये, असे सांगायचा अधिकार कुणाला आहे? की काही तडजोड करण्यासाठी अशी लोक अधिवेशनात येतात आणि आमदारही त्यांना का एंटरटेन करतात? त्यांनी असे करू नये, असा रोख निलम गोऱ्हे यांचा होता. याबाबत त्यांनी सभागृहातच स्पष्ट सूचना दिली आणि यापुढे कुणी अशा कामांसाठी दालनात येऊ नये, असे खडसावले.

आज घडलेल्या या प्रकारामुळे काही आमदार ॲडजेस्टमेंटसाठी येतात की काय, असा प्रश्‍न चर्चिला जात आहे. यासंदर्भात सांगताना निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या, मध्यंतरी काही लोक मला दालनात भेटायला आले. त्यांच्यासोबत एक आमदारही (MLA) होते. आम्हाला या लक्षवेधीवर बोलायचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमच्यावर अन्याय झाल्याचेही ते म्हणाले. मी त्यांना ओळख मागितली. त्यामध्ये एक खासगी सावकार होता. ते आमदार त्यांना सोबत घेऊन आले होते.

याच वेळी कोपऱ्यात एक जण उभा होता. त्याला विचारले असता, तो म्हणाला की, मी तालुक्याचा अधिकारी आहे. प्रश्‍न लागताच किंवा लक्षवेधी लागताच लोक अधिवेशनात येतात. हे योग्य नाही. आम्हाला भेटून एखादी लक्षवेधी लावावी की लावू नये, असे कुणी सांगू नये.

Neelam Gorhe
Neelam Gorhe News: सभागृहात आमदारांना आवरेना मोबाईलचा मोह, सभापतींनी ‘अशी’ दिली समज !

त्यांचे जे काही म्हणणे असेल ते आमदारांनी लेखी स्वरूपात द्यावे. अशा पद्धतीने कुणीही भेटायला येण्याचा प्रयत्न करू नये. यासंदर्भात सरकारी अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत, असेही गोऱ्हे म्हणाल्या.

त्यांच्यावर अन्याय काय झाला, असे त्यांना विचारले असता ते लोक म्हणाले की, आम्ही कारवाई केल्यानंतरही त्याची बातमी आली. हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. पण येवढ्यासाठी ते दालनात का गेले आणि एक आमदारही त्यांच्यासोबत होते, ते कशासाठी, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. निलम गोऱ्हेंनी सभागृहातच ताकीद दिल्यामुळे ही आमदारांसाठी समज असल्याचीही चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com