अकोला : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा काल १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान अकोला (Akola) जिल्ह्यात दाखल झाली व थेट मुक्कामाला साईबाबा जिनिंग फॅक्टरी पातुर येथे पोहोचली.
संध्याकाळी उशिरा पोहोचून सकाळी सहा वाजता निघालेल्या पदयात्रेत महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांतील कार्यकर्ते व समर्थक हजारोंच्या संख्येने पातूर मध्ये दाखल झाले होते. यावेळी पातुर शहरात जनसागर लोटला होता. यात्रेची सुरुवात पातुर येथील शहा बाबू उर्दू हायस्कूल पासून झाली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी सकाळी यात्रेत सहभाग नोंदवला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पाहण्यासाठी बघ्यांची एवढी गर्दी होती की रस्त्याच्या दुतर्फा अंदाजे दोन किलोमीटरपर्यंत जनसागर दिसत होता. एवढा मोठा यात्रा उत्सव पाहून काँग्रेस (Congress) नेत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले यावेळी दिसले.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश तायडे, काँग्रेस शहराध्यक्ष चंदू भारताचे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फेटे बांधून राहुलजींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला व एजविला पब्लिक स्कूलच्या मुलांनी ‘राहुलजी आओ ना, हम आपका इंतजार कर रहे है!’ अशा प्रकारचे नारे दिल्याने राहुल गांधींचा मुलांजवळ जाण्याचा मोह आवरला नाही त्यांनी मुलांजवळ जाऊन त्यांचे धन्यवाद मानले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामसिंग जाधव व वसंतराव नाईक विद्यालयाने राहुल गांधींचे स्वागत केले. तर बाळापुर रोडवरील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या १०० विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या वेशात येऊन यात्रेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी राहुल गांधी यांनी हात जोडून अभिवादन केले. एकंदरच या यात्रेला लोकांचा उत्साह पाहून लोकांना परिवर्तन पाहिजे असल्याचे जाणवले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.