Nitin Deshmukh's Agitation: सांगितले आमदार निवास अन् नेले अकोल्याला, पोलिसांनी केली दिशाभूल !

Devendra Fadanvis : ही यात्रा देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानावर धडकणार होती.
Nitin Deshmukh and Others
Nitin Deshmukh and OthersSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nitin Deshmukh's Sangharsh Yatra: उद्धव ठाकरे गटाचे आक्रमक नेते अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी ६९ खेड्यांचा पाणीप्रश्न घेऊन पाणी पदयात्रा सुरू केली. आज सकाळी ही यात्रा देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील त्रिकोणी पार्क येथील निवासस्थानावर धडकणार होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी आमदार देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

६० ते ७० कार्यकर्त्यांसह आमदार देशमुख यांना थेट अकोल्याला नेण्यात आले, तर अकोल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहरप्रमुख राहुल तराळे यांच्या चौघांना हिंगणा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. बाळापूर मतदारसंघातील पाणी प्रश्नावरून आमदार नितीन देशमुखांची अकोला ते नागपूर पदयात्रा १० एप्रिलपासून सुरू झाली होती. अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरापासून ही यात्रा सुरू झाली होती.

यात्रा अमरावती जिल्ह्यात दाखल झाली असताना या पदयात्रेसाठी देशमुखांनी प्रशासनाची परवानगी मागितली नव्हती. तसेच जिल्ह्यातील जमावबंदीचे आदेश धुडकावल्याप्रकरणी आमदार देशमुख यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्त्यांवर तेव्हाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. काल सायंकाळी ही यात्रा नागपूरच्या सीमेवर येऊन धडकली. येथेही त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करू नये, तर इतरत्र दुसरे स्थळ शोधून त्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी, अशी नोटीस पोलिसांनी जिल्हाप्रमुख दातकर यांना बजावली होती. त्यानंतर आम्ही आंदोलन करण्यासाठी नाही, तर उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलो आहोत, असे उत्तर शिवसेनेच्यावतीने देण्यात आले होते.

पत्रकारांनी पोलिसांकडे विचारणा केली असता, आमदार नितीन देशमुख व आंदोलकांना नागपूरच्या आमदार निवासापर्यंत जाऊ देणार आहोत, असे सांगण्यात आले होते. पण पोलिसांनी नागपुरात पोहोचण्याच्या आधीच आमदार देशमुखांना आज सकाळी ७ वाजता ताब्यात घेतले.

Nitin Deshmukh and Others
Nitin Deshmukh : पंतप्रधान मोदींच्या फोटोमुळे शिवसेनेला तोटाच; नितीन देशमुखांनी मांडलं गणित

ताब्यात घेतल्यानंतर आमदार देशमुख व आंदोलकांना अमरावतीला (Amravati) नेत असल्याची माहिती मिळाली. पण तसे न करता त्यांना थेट अकोल्यात नेण्यात आले. इकडे पत्रकार सकाळी आमदार निवासाकडे जाण्याच्या तयारीत असताना सकाळी ७ वाजताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे पोलिसांनी पत्रकारांची दिशाभूल केल्याची चर्चा नागपुरात रंगली.

६९ गावांतील नागरिकांच्या पाणी प्रश्नांवरुन आमदार देशमुख (Nitin Deshmukh) यांनी राज्य सरकारविरोधात (State Government) आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी अगदी लहान बाळालाही हेच पाणी पाजावं लागतंय. तीन महिन्यांच्या बाळाला हे पाणी इथल्या महिला पाजतात, तेव्हा त्यांना काय वेदना होत असतील, असा भावनिक सवालही विचारला आहे. महिला आणि येथील नागरिकांचा हाच प्रश्न घेऊन नितीन देशमुख या गावांतील पाणी एका टँकरमध्ये जमा करून फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) निवासस्थानी आज पोहोचणार होते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.