Nitin Gadkari News: गडकरींच्या गुडबुकमधील ब्रिजेश दीक्षितांना मुदतवाढ नाकारली !

Denied Extension of Brajesh Dixit: गेल्या आठ वर्षांपासून त्यांनी नागपूर मेट्रोच्या प्रकल्पावर काम केले.
Brajesh Dixit and Nitin Gadkari
Brajesh Dixit and Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Metro's Managing Director General News : नागपूरची मेट्रो म्हटलं की एक नाव पुढे येतं, ते म्हणजे ब्रिजेश दीक्षित. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे ते व्यवस्थापकीय महासंचालक होते. गेल्या आठ वर्षांपासून त्यांनी नागपूर मेट्रोच्या प्रकल्पावर काम केले. पण आता त्यांना मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे दीक्षितांच्या टीममधील सहकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. (The central government has refused to extend the deadline)

ब्रिजेश दीक्षित गडकरींच्या गुडबुकमध्ये टॉपवर होते. त्यामुळे त्यांना वयाच्या पासष्टीनंतरही मुदतवाढ मिळेल, अशी आशा होती. ते स्वतः हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या मानसिकतेत होते. दीक्षित अजूनही फिट आहेत, काम करू शकतात, असे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांचा फिटनेस पाहता आणखी काही वर्ष किंबहुना नागपूर मेट्रोचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ते काम करू शकले असते. पण केंद्र सरकारला हे मंजूर नव्हते, असं त्यांचे समर्थक सांगतात.

देशात सर्वाधिक कार्यक्षम आणि वेगवान मंत्री म्हणून नितीन गडकरी ओळखले जातात. रस्त्याचे जे जाळे त्यांनी देशभर विणले, त्यावरून त्यांना ‘रोडकरी’ व ‘पूलकरी’ ही टोपणनावे पडली. २०१४मध्ये त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार होता. त्यानंतर त्यांच्याकडे एमएसएमई आणि सिंचन हे खातेही देण्यात आले. कालांतराने त्यांच्याकडील खाते एक-एक करून कमी करण्यात येत गेले. त्यामुळेच वरिष्ठांकडून त्यांना कुठेतरी कमी लेखण्याचे काम होते आहे का, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

गडकरींच्या नेतृत्वात नागपूर मेट्रोचे काम उत्तम पद्धतीने ब्रिजेश दीक्षित यांनी केले. निवृत्त झाल्यानंतरही त्यांना मुदतवाढ देण्यात आली. तब्बल वय वर्षे ६५ होईपर्यंत त्यांनी मेट्रोचे काम केले आणि आताही त्यांना मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा होती. चांगल्या कामात सरकार आडकाठी आणणार नाही, असेही वाटत होते.

Brajesh Dixit and Nitin Gadkari
Nagpur News : नितीन गडकरी बिनधास्त पण नाना पटोलेंचे असणार कडवे आव्हान; असे असेल गणित!

नागपूर मेट्रो हा प्रकल्प दीक्षितांपासून खऱ्या अर्थाने सुरू झाला होता आणि हा प्रकल्प शेवटास जाईपर्यंत काम करण्याची त्यांची स्वतःची इच्छा होती. त्यामुळे गडकरी त्यांच्यासाठी मुदतवाढ करवून घेतील, असे वाटत असतानाच वयाचा दाखला देत केंद्र सरकारने मुदतवाढ नाकारली. नागपुरातील दोन गटांमध्ये सुरू असलेला छुपा वॉर यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

कॉंग्रेसचे (Congress) आमदार विकास ठाकरे यांनी दीक्षितांच्या विरोधात कंबर कसली आहे. काल (ता. १६) आमदार ठाकरेंनी दीक्षितांवर विविध आरोप केले. ब्रिजेश दीक्षित यांना पुन्हा मुदतवाढ देणे, योग्य नाही. अशा माणसाला मुदतवाढ देऊच नये. कॅगच्या अहवालात जी अनियमितता दाखवण्यात आली आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. पण ती चौकशी न होता, त्यांना बढती दिली जाणार होती. त्यामुळे नाइलाजाने मुख्यमंत्र्यांना (Chief Miniser) पंतप्रधानांना पत्र लिहावे लागले, असे आमदार ठाकरे म्हणाले.

Brajesh Dixit and Nitin Gadkari
Nagpur District APMC Election : सहा बाजार समित्या जिंकणाऱ्या कॉंग्रेसला उमरेडने पुन्हा दिली हुलकावणी !

विधानसभेत पुन्हा उचलणार मुद्दा ?

एका मंत्र्याने असं काही केलं, तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होतो आणि त्याला जेलमध्ये टाकले जाते. मग एका अधिकाऱ्याच्या कामावर कॅगने ताशेरे ओढले असताना, त्याच्यावर अनियमिततेचा ठपका ठेवला असताना त्याला सुरक्षा का? त्याची चौकशी व्हावी, ही माझी मागणी होती, असे आमदार ठाकरे म्हणाले.

मी केलेली मागणी आता पूर्ण झालेली आहे. पण आता कॅगने जो ठपका ब्रिजेश दीक्षित याच्यावर ठेवला, त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, आता ही माझी पुढची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाली नाही, तर विधानसभेत मी हा मुद्दा पेटवणार आहे, असे आमदार ठाकरे (Vikas Thakre) यांनी सांगितले.

Brajesh Dixit and Nitin Gadkari
Nagpur Assembly Constituency News: नागपूर पूर्वमध्ये भाजपला पराभूत करणे आघाडीसाठी अवघड नाही, पण...

खरं काय?

ब्रिजेश दीक्षित यांनी वयाची पासष्टी ओलांडली आहे. त्यामुळे केंद्राने (Central Government) आता त्यांना मुदतवाढ नाकारली आहे. असे केले नाही, तर आणखी काही अधिकारी पुढ्यात येऊन उभे होतील आणि मुदतवाढ मागतील. तशा परिस्थितीत सरकारची मोठी अडचण होणार आणि एका अधिकाऱ्यासाठी वेगळे नियम आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांसाठी वेगळे नियम करून नाही चालणार, असे केंद्र सरकारचे म्हणणे पडले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com