Nitin Gadkari News : माजी नगरसेवक विसरले नितीन गडकरींचे आवाहन, निवडणुकीत फटका बसणार?

Nagpur : नितीन गडकरी यांनी झाडांच्या देखरेखीबाबत अनेकदा आवाहन केले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nitin Gadkari's appeal regarding maintenance of trees : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरसाठी मोठमोठी कामे खेचून आणली. सिमेंट रस्ते, उड्डाण पूल, मेट्रो, फुटाळा फाउंटन आदी कामे करून त्यांनी शहर सजवून टाकले. शहरात लावलेल्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी नगरसेवकांवर सोपवली होती. तसे आवाहन त्यांनी केले होते. पण नगरसेवक त्यांचे आवाहन विसरले. (The corporators forgot Gadkari's appeal)

सिमेंट रस्ते दुभाजकांवर लावण्यात आलेली चार ते पाच फुटांची हिरवीगार झाडे महापालिका, नासुप्रच्या अनास्थेमुळे वाळली आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी लावण्यात आलेली शंभरावर झाडे मृत होण्याच्या स्थितीत पोहोचली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी झाडांच्या देखरेखीबाबत अनेकदा आवाहन करूनही ही स्थिती झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरात अनेक भागांत दुभाजकांवर वृक्षारोपण करण्यात आले. या झाडांना महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासतर्फे उन्हाळ्यात पाणी दिले जाते. परंतु याबाबतही महापालिका, नासुप्रतर्फे भेदभाव केला जात असल्याचे चित्र आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर, दक्षिण नागपुरातील रिंग रोडवरील झाडांना पाणी दिले जाते. मात्र, त्यापुढे वाठोडा भागात स्वामी नारायण मंदिर परिसरात लावलेल्या झाडांना पाणी न दिल्याने रिंग रोडवरील झाडे वाळली आहेत.

एवढेच नव्हे पूर्व नागपूरचा भाग असलेल्या केडीके कॉलेज ते हिवरीनगरपर्यंत दुभाजकांवरील हिरवी झाडेही कोमेजली असून तीही वाळण्याच्या स्थितीत आहे. या दोन्ही परिसरातील दुभाजकांवरील शंभरावर झाडे वाळली आहेत. सिमेंट रस्ते झाल्यानंतर दुभाजकांवर झाडे लावण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आग्रह आहे. त्यांनी दक्षिण-पश्चिममध्ये रिंग रोडच्या लोकार्पणादरम्यान झाडांची निगा राखण्यासाठी माजी नगरसेवकांना आवाहन केले होते.

Nitin Gadkari
Nitin Gadkari News : खुद्द नितीन गडकरी ‘ती’ झाडे पाहण्यासाठी आले; पैठणमध्ये ५१ वटवृक्षांचे यशस्वी पुनर्रोपण, देशातील पहिला प्रयोग

केडीके कॉलेज परिसर तसेच रिंग रोडवरील झाडे वाळल्याने त्यांचे आवाहन कुणीही गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. महापालिका, नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यासवर रस्त्यांवरील झाडांची देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे. परंतु काही भागात जबाबदारी पार पाडली जाते तर काही भागाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने झाडे लावणे, त्यांची काळजी घेण्याची गरज पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जाते.

वन्यप्रेमींच्या आवाहनाकडेही कानाडोळा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे दरवर्षी पावसाळ्यात झाडे लावली जातात. परंतु उन्हाळ्यात त्यांची योग्य निगा राखली जात नसल्याने ती वाळतात. (Municipal Corporation) महापालिका, नासुप्रचे अधिकारी वाठोडा परिसरातील रिंग रोड तसेच केडीके कॉलेज परिसरातून नेहमीच फिरतात. परंतु त्यांनाही वाळलेली ही झाडे दिसू नये, याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com