Nitin Gadkari News : मुलांना मोबाईलच्या विळख्यातून काढण्यासाठी नितीन गडकरींनी केला ‘हा’ उपाय !

Nagpur Political News: मुले मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून मैदानावर खेळली पाहिजेत.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

Gadkari Wardha Marg Review Meeting: मोबाईलमुळे लहान मुलांचे बालपण हिरावले जात असून याबाबत चिंता व्यक्त होते. मैदानावरील खेळ व व्यायामातून चिमुकल्यांचे बालपण परत आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी त्यांनी काल (ता. २१) त्यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी आढावा बैठक घेतली. (Children should get out of the cage of mobiles and play on the field)

मुले मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून मैदानावर खेळली पाहिजेत. त्यासाठी शहरातील मैदाने, त्यावर विविध खेळांचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक या सर्व बाबी तातडीने सज्ज करण्याचे निर्देश गडकरींनी नागपूर सुधार प्रन्यासला दिले. शहरात महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या विविध प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी वर्धा मार्गावरील निवासस्थानी त्यांनी आढावा बैठक घेतली.

बैठकीत मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी भाजी व मटण मार्केट, गोकूळपेठ बाजारपेठेचे आर्किटेक्चर डिझाईन, नेताजी मार्केट, फुल मार्केट, कॉटन मार्केट, यशवंत स्टेडियम, क्रेझी कॅसल, डिक दवाखाना, क्रीडांगणे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक आदी प्रकल्पाची माहिती घेतली.

महाल येथील बुधवार बाजाराबाबत गडकरी यांनी कायदेशीर कार्यवाही वेगाने करण्याची सूचना दिली. बाजारातील किरकोळ व्यापाऱ्यांसाठी सर्व सोयीयुक्त मार्केट उभे करण्याचे काम तातडीने गरज त्यांनी व्यक्त केली. ज्या लोकांची उपजीविका भाजी व मटन मार्केटवर अवलंबून आहे, त्यांच्या सर्व सोयी-सुविधांचा विचार करून हे काम करावे, असे गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Nitin Gadkari
Nitin Gadkari यांची बुलढाण्यात फटकेबाजी | BJP | Buldhana | Sarkarnama Video |

गांधीबाग येथील सोख्ता भवन, दही बाजार, पोहा ओळी येथील नियोजनाचा आढावाही त्यांनी घेतला. ऑरेंज सिटी स्ट्रीटवरील महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) अख्त्यारीत असलेल्या जागांच्या वापराबाबत काय नियोजन आहे. किती दिवसांमध्ये ते पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे, याचीही माहिती सादर करण्यास त्यांनी सांगितले. भूसंपादन प्रकरणातील मोबदला वितरणही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) दिले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com