Nagpur Indian Science Congress News : १०८व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झाले. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे. जल, जमीन आणि जनावरांवर आधारीत उद्योगांसाठी विज्ञानाचा उपयोग करून नवीन रचना तयार करावी लागणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitn Gadkari) म्हणाले.
आजपासून नागपुरात (Nagpur) सुरू झालेल्या १०८व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे पार पडले. यावेळी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) सायन्स आणि टेक्नॉलॉजी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, विजयालक्ष्मी सक्सेना आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी उपस्थित होते. नागपूरचा खासदार म्हणून ऑरेंज सिटी आणि वाघांच्या राजधानीत मी येथे आलेल्या सर्वांचे स्वागत करतो, असे म्हणत गडकरींनी भाषणाला सुरुवात केली.
गडकरी म्हणाले, नागपूर विद्यापीठ आपल्या कार्यकाळाचे १०० वर्ष पूर्ण करीत आहे आणि याच वेळी राष्ट्रीय विज्ञान कॉंग्रेस नागपुरात आयोजीत झाली, याचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना आहे. मोदींनी आत्मनिर्भर भारत आणि ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. देशात जीडीपी ग्रोथमध्ये ५२ ते ५४ टक्के योगदान सर्व्हिस सेक्टरमधून, २२ ते २४ टक्के मॅन्युफॅक्चरींग सेक्टरमधून आणि १२ ते १४ टक्के कृषी क्षेत्रातून आहे. आजही ६५ टक्के जनता खेड्यांमध्ये राहते. शेतकरी आणि शेतमजुरांच्या विकासासाठी सायन्स टेक्नॉलॉजीची मदत घ्यावी लागणार आहे. जल, जमीन आणि जनावरांवर आधारीत उद्योगांसाठी विज्ञानाचा उपयोग करून घ्यावा लागणार आहे.
कुठलीही संसाधने वाया जायला नको. वेस्टमधून वेल्थ जमा झाली पाहिजे. यासाठी सायन्स आणि टेक्नॉलॉजीची मोठी मदत होणार आहे. हे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. आयात कमी करून निर्यात वाढवावी लागणार आहे. त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे. हे अर्थव्यवस्थेचे पिलर आहेत. ग्रामीण भारतातून जीडीपी वाढवावा लागणार आहे. तेव्हा कुठे आपण मोदींच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत उभारू शकू. आज नागपूर विद्यापीठ १०० वर्ष पूर्ण करीत आहे. मी याच विद्यापीठातून शिकलेला विद्यार्थी आहे. माझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे. जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सायन्स आणि टेक्नॉलॉजीशिवाय पर्याय नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.