नितीन राऊत निळी टोपी घालतात, तेवढेच ते निळे; बाकी ते दलित विरोधीच...

मेश्राम म्हणाले, Dharmpal Meshram रमाई घरकुल योजनेचा निधी दोन वर्षांपासून रोखून महाविकास आघाडी सरकार दलितांवर अन्याय करीत आहे. या विरोधात भाजपच्यावतीने BJP २७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.
Dharmpal Meshram at press club
Dharmpal Meshram at press clubSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपासून रमाई घरकुल योजनेचा निधी रोखून धरला आहे. असे असतानाही निळी टोपी घालून वावरणारे तथाकथित आंबेडकरवादी नेते राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एक पत्र देण्याशिवाय काहीही केले नाही. ते निळी टोपी घालतात, तेवढेच निळे आहेत. बाकी ते दलितविरोधीच आहेत, असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी आज केला.

पत्रकार परिषदेत मेश्राम म्हणाले, रमाई घरकुल योजनेचा निधी दोन वर्षांपासून रोखून महाविकास आघाडी सरकार दलितांवर अन्याय करीत आहे. या विरोधात भाजपच्यावतीने २७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे. भाजपच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रमाई आवास योजनेसाठी प्रथम २०१४ मध्ये १४ कोटी त्यानंतर २०१७ मध्ये २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे सुमारे सातशे दलित कुटुंबांना याचा पूर्णपणे लाभ झाला होता. राज्यात आघाडीची सत्ता आली तेव्हापासून नागपूर शहराला एक रुपयाचेही अनुदान देण्यात आले नाही.

जुलै महिन्यात पालकमंत्री नितीन राऊत यांनी रमाई घरकुल योजनेसाठी ४० कोटी रुपयांचा निधी हवा आहे, एवढे एक पत्र सरकारला दिले होते. हाच एकमेव अपवाद वगळता निळी टोपी घालून फिरणाऱ्या पालकमंत्र्यांनी दलितांसाठी काहीच केले नसल्याचा आरोपही यावेळी धर्मपाल मेश्राम यांनी केला. रमाई योजनेंतर्गत दलितांना घरकुल बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान टप्प्याटप्याने दिले जाते. त्यानुसार ९९० लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. याशिवाय २७४ लाभार्थ्यांचा अनुदानाचा दुसरा टप्पा अडकून पडला आहे. फडणवीस यांच्या कार्यकाळातील साडेसात कोटी रुपये महापालिकेत पडून आहेत.

Dharmpal Meshram at press club
काहीच राहिलं नाही..पाणीच पाणी आहे : देवेंद्र फडणवीस

महापालिका आयुक्तांना याबाबत विचारणा केली असता राज्य सरकार परवानगी देत नसल्याने खर्च करता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आघाडीचे सरकार दलित विरोधी असून याविरोधात भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपचे सर्व आमदार आणि पदाधिकारी यात सहभागी होतील. रमाई घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या दलित नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन धर्मपाल मेश्राम यांनी केले. पत्रकार परिषदेला भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अशोक मेंढे, माजी आमदार मिलिंद माने, माजी उपमहापौर संदीप जाधव, अनुसूचित मोर्चाचे शहराध्यक्ष राजेश हातीबेड, चंदन गोस्वामी, नीता ठाकरे, कीर्तीदा अजमेरा आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com