अतिवृष्टीग्रस्त ४७ गावांना मदत दिली नाही, भाजप पदाधिकारी संतप्त; टोकाची भूमिका घेणार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितल्यानंतरही चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील ४७ गावांना मदतीपासून दूर ठेवण्यात आले आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : अतिवृष्टीमुळे राज्यभर शेतांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईपासून कुणीही वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले आहे. त्यानंतरही चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील ४७ गावांना मदतीपासून दूर ठेवण्यात आले आहे.

राज्यात सत्तेत भारतीय जनता पक्ष (BJP) सहभागी आहे आणि हा आरोप दुसरा, तिसरा कुणी नाही, तर भाजपच्याच जिल्हा सचिवांनी केला आहे. आपल्याच सरकारला हा घरचा अहेर त्यांनी दिला आहे. मागास, दुर्गम व सिंचनाची कुठलीच सुविधा नसलेल्या गोंडपिपरी तालुक्याला यंदा पावसाने झोडपून काढले. गावागावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या शेतजमीन पुरात बुडाल्या. अशा अडचणीच्या काळात मायबाप सरकार (State Government) मदतीचा हात देईल, अशी आशा होती. पण ती पुरती फोल ठरली. ९८ गावांचा समावेश असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील तब्बल ४७ गावांना अतिवृष्टीच्या मदतीपासून डच्चू देण्यात आला.

वगळण्यात आलेल्या ४७ गावांव्यतिरिक्त गावांतील नाममात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली. या संपूर्ण प्रकारामुळे भाजपचे जिल्हा सचिव व पंचायत समितीचे माजी सभापती दीपक सातपुते यांनी प्रशासनाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तालुक्यातील त्या ४७ गावांत अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्यांना मदत मिळाली नाही तर टोकाची भूमिका घेण्याचा इशारासुद्धा सातपुतेंनी दिला आहे. यंदा रेकार्डब्रेक पावसाने बळीराजाचे नुकसान झाले. हाती येणारे पीक पावसाने अक्षरशः हिसकावून नेले. आशा स्थितीत शासनाकडून पंचनामे, सर्व्हेक्षण करून ५१ गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. मात्र ही मदत देखील नाममात्रच ठरली, असल्याचे सातपुते यांचे म्हणणे आहे.

गोंडपिपरीच्या दोन, धाब्याचे सात, तळोधीचे नऊ व इतर गावांतील शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले. दरम्यान प्रशासनाकडून केवळ पुरबुडीचा सर्व्हे करण्यात आला. त्याला अतिवृष्टीचा सर्व्हे दाखवून आकडा दाखविण्यात आल्याचा आरोप दीपक सातपुते यांनी केला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तब्बल ४७ गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीपासून डच्चू देण्यात आल्याने शेतकरी कमालीचे चिडले आहेत. ४७ गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाने नियोजन करावे, यासाठी दीपक सातपुते यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देऊन सदर गंभीर बाब समोर आणली.

Eknath Shinde
Ncp : अतिवृष्टी, पुराने शेतकरी, नागरिक हैराण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र वाटाघाटीत दंग

प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यातील तब्बल ४७ गावांतील शेकडो शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या.

- दीपक सातपुते, चंद्रपूर जिल्हा सचिव भाजप, माजी सभापती पं.स. गोंडपिपरी.

ज्या ज्या गावांत शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे. त्यांचा मदत यादीत समावेश झालेला आहे. ज्या गावांत नुकसान झाले नाही. त्या गावांना नुकसानीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने सर्व्हेक्षणाचे काम झालेले आहे. ज्याच नुकसान झालच नाही, त्यांना मदत कशी काय देणार?

के. डी. मेश्राम, तहसीलदार, गोंडपिपरी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com