Nagpur : झाडे, खोब्रागडे, अडबालेंचे नामांकन दाखल, आघाडी उद्या करणार घोषणा !

Rajendra Zade : शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे तिसऱ्यांना आपले नशीब आजमावत आहे
Election of Teachers Legislative Council
Election of Teachers Legislative CouncilSarkarnama

Election of Teachers Legislative Council : शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहूजन आघाडीचे दीपराज खोब्रागडे, विदर्भ माध्यमिक संघाचे सुधाकर अडबाले, रामराव चव्हाण, अजय भोयर, मृत्युंजय सिंग अशा एकूण सहा उमेदवारांनी विभागीय शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Election) मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुवार उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे तिसऱ्यांना आपले नशीब आजमावत आहे. मागील निवडणुकीत त्यांनी भाजपचे (BJP) समर्थित राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार माजी आमदार नागोराव गाणार यांना कडवी झूंज दिली होती. अवघ्या दोन हजार मतांनी त्यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यावेळीसुद्धा काँग्रेसने (Congress) त्यांना समर्थन जाहीर केले नव्हते. काही बंडखोरांमुळे झाडे यांना पराभूत व्हावे लागले होते. दुसऱ्या क्रमांकाच्या मतांमुळे त्यावेळी गाणार तरले होते. यावेळी झाडे यांनी काँग्रेसला समर्थन मागितले होते. मात्र एकाही नेत्याने अद्याप याची दखल घेतलेली नाही.

भाजपनेही अद्याप कोणाला समर्थन जाहीर केले नसले तरी ते गाणार यांनाच पाठिंबा देणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहजून आघाडीच्यावते दीपराज खोब्रागडे रिंगणात आहेत. आंबेडकर कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे कार्य आहे. चंद्रपूरचे सुधाकर अडबले यांनीसुद्धा दावेदारी दाखल केली असून त्यांचाही प्रयत्न महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी सुरू आहे. त्यांनी आपल्या प्रचाराच्या पोस्टरवर माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा फोटो छापून तसे संकेत दिले आहेत. गुरवारी शेवटच्या दिवशी अर्ज आल्यानंतर कोणकोण रिंगणातून माघार घेतात, यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Election of Teachers Legislative Council
Vidhan Parishad election News : नागपूर शिक्षक मतदारसंघातून कोण रिंगणात ?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत महविकास आघाडीचा उमेदवार राहणार असल्याचे सांगितले. आता आघाडी कोणाला समर्थन जाहीर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीने पदवीधरमध्ये अभिजित वंजारी यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा काँग्रेसकडे खेचून आणली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com