OBC Against Maratha Arkshan : मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास ओबीसी रस्त्यावर उतरणार...

Maharashtra Government : ओबीसी कृती समिती, सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ व समविचारी संघटनाचा शासनाला इशारा.
OBC Agitation
OBC AgitationSarkarnama
Published on
Updated on

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून देण्यात येवू नये, यासाठी गोंदियातील ओबीसी संघटनांनी एल्गार पुकारला आहे.मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास ओबीसी रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करतील, असा इशारा ओबीसी कृती समिती, सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ व समविचारी संघटनानी दिला आहे.

राज्यात मराठा आरक्षणा मुद्दा चांगलाच तापत आहे. दरम्यान आता सरकारद्वारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच आरक्षण देण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करून मराठवाडा विभागातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागणी केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्यात सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

म्हणजेच कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. सन 2004च्या शासन परिपत्रकानुसार पहिलेच कुणबी-मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा कुणबी, लेवा पाटीदार, पाटीदार याना ओबीसींचे आरक्षण मिळत आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून त्याचा विरोध करण्यासाठी ओबीसी संघर्ष कृती समिती, सेवासंघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी आंदोलन केले होते.

गोंदिया जिल्ह्यात भव्य मोर्चे आंदोलन सुरू केल्यानंतर 29 सष्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, ओबीसी खात्याचे सचिव व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे व इतर ओबीसी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, असे आश्वासन दिले.

परंतु आता मराठा नेते मनोज जरांगे हे वारंवार कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करीत आहेत. तसेच सगेसोयरे यांनासुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करीत आहेत. सरकारसुध्दा वारंवार त्यांना प्रतिसाद देत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कृणबी जातीचे दाखले दिल्यास ओबीसी संघर्ष कृती समिती, सेवासंघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि समविचारी संघटना जिल्ह्यात व राज्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा इतक्या लवकर शांत होईल असे चिन्ह दिसत नाहीत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com