OBC Kranti Morcha News : अजित पवारांना ओबीसी वसतिगृहाचा तिटकारा का, ‘या’ ओबीसी संघटनेचा थेट सवाल !

Maharashtra Finance Department : वित्त विभागानेच वसतिगृह सुरू होण्याच्या कामात खोडा निर्माण केला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Bhandara Political News : राज्यभर ओबीसी समाजाद्वारे सुरू असलेले आंदोलन अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर ३० सप्टेंबरला संपले. असे असले तरी सरकारवर ओबीसी नेत्यांची आगपाखड अद्यापही सुरू आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वित्त विभागानेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या वसतिगृह बांधकामाला अद्याप निधी दिला नाही. (It is the finance department that has created a mess in the work of starting the hostel)

वित्त विभागानेच वसतिगृह सुरू होण्याच्या कामात खोडा निर्माण केला आहे, असा आरोप भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाने केला आहे. ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी हा आरोप केला आहे. वसतिगृहाला लागणाऱ्या निधीची फाइल अद्याप पास न झाल्याचेही मते यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. महाराष्ट्रातील ओबीसी हा शैक्षणिक आणि आर्थिकदृष्या मागासलेला आहे.

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या, विभागाच्या अथवा मुंबई किंवा पुणे यांसारख्या शहरात राहावे लागते. दरम्यान, या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची घोषणा केली आहे. या संदर्भात इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी १५ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू होतील, अशी ग्वाही पावसाळी अधिवेशनात दिली होती.

ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. अशा २१ हजार ६०० विद्यार्थ्यांना आधार योजना सुरू होईल, या योजनेचा लाभ प्रत्येक जिल्ह्यातील ३०० मुले आणि ३०० मुलींना मिळेल, असे सांगितले गेले आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की, ओबीसी वसतिगृहाची घोषणा होऊनही वित्त विभागाची त्याला अद्याप परवानगी नाही, तर आधार योजनेबाबतही वित्त विभागाची भूमिका सारखीच आहे.

आता वित्त विभाग राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे अजित पवारांना ओबीसी वसतिगृहाचा तिटकारा आहे का, असा सवाल भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाने विचारला आहे. त्यामुळे त्वरित मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, ३० सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ओबीसी समाजाने आंदोलन स्थगित केले. आता पुन्हा ओबीसी संघटनांनी सरकारला धारेवर धरल्याने इतक्यात ओबीसी समाज शांत होईल, असे वाटत नाही.

Edited By : Atul Mehere

Ajit Pawar
Bhandara OBC News : पितृपक्षात ओबीसी करणार नाहीत पूजा विधी, कारण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com