Babanrao Taywade : मराठा समाजानं निदान मुख्यमंत्र्यांच्या जाहीर शपथेवर तरी विश्वास ठेवावा

Maratha Reservation : घाई न करता संयमानं घेतल्यास आरक्षणाची फळं चाखता येतील
Babanrao Taywade on CM Eknath Shinde Oath
Babanrao Taywade on CM Eknath Shinde OathGoogle
Published on
Updated on

OBC Leader From Nagpur : मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाबद्दलचे प्रेम साहजिक आहे. परंतु ७० वर्षांपासून त्यांचं आरक्षण कोणीही हिसकावलेलं नाही. देशात सर्वच गोष्टी संविधानाप्रमाणं चालतात. आरक्षणही संविधानानुसार मिळतं. त्यामुळं जरांगे यांनी ही बाब समजून घेतली पाहिजे. सरकार वारंवार सांगत आहे की, आम्ही मराठा आरक्षणाप्रती कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतलीय. त्यांच्या शपथेवर तरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे, असं आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केलं.

गुरुवारी (ता. १६) नागपूर येथे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून येणाऱ्या वक्तव्यांबद्दल प्रतिक्रिया दिली. आरक्षणासंदर्भात अनेक आयोगांनी काम केलंय. त्यासंदर्भातील यादी जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार प्रवार्गाना आरक्षण देण्यात आलंय. त्यामुळे कोणी जर म्हणत असेल की एखाद्या प्रवर्गानं आरक्षण लुटलं, तर असं म्हणणं योग्य नाही, असं डॉ. तायवाडे म्हणाले. (OBC Leader Babanrao Taywade From Nagpur Says Manoj Jarange Patil Should Realized The Constitution on Maratha Reservation)

ओबीसींना जे आरक्षण मिळालं, ते संविधानानं मिळालंय. ओबीसीची संख्या ५२ टक्के आहे. मात्र, संविधानानुसार ५० टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही. त्यामुळं ओबीसींना फक्त २७ टक्के आरक्षण मिळालंय. काही नेत्यांना कार्यकर्त्यांकडून धमक्या मिळत आहेत. काहींना लिखित स्वरूपात धमक्या आल्या आहेत. अशा धमक्या देणं योग्य नसल्याचं डॉ. तायवाडे म्हणाले. ओबीसी केवळ आपलं आरक्षण टिकावं, यासाठी प्रयत्न करीत आहे. मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध नाहीच.

मराठा समाजाला ओबीसींचं आरक्षण हिरावून न घेता कसं आरक्षण द्यायचं तो सरकारचा प्रश्न आहे. सरकारनं यासाठी वेळ मागितलाय. सरकारला वेळही देण्यात आलाय. परंतु ठरलेल्या वेळापत्रकातच मागणी पूर्ण होईल, असा अट्टाहास करणं योग्य नाही. सरकारपुढं अनेक मुद्दे असतात. त्या सगळ्या संविधानात बसवायच्या असतात. त्यामुळे कायदेशीर बाबी तपासूनच कोणताही निर्णय सरकारला घ्यावा लागतो, असं डॉ. तायवाडे यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसी समाजाला समजून घ्या

ओबीसी समाज सर्वांना घेऊन चालणारा समाज आहे. आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबाच दिला आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मर्यादा शिथिल करून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. मराठा समाज असे करणार असेल तर आम्ही त्यांना साथ देऊ. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही हे आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो, असं डॉ. तायवाडे म्हणाले.

Edited by : Prasannaa Jakate

Babanrao Taywade on CM Eknath Shinde Oath
Babanrao Taywade : लिंगायत, मारवाडी नोंदी आढळल्यानं सरकारनं कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा गंभीरतेनं घ्यावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com