Maharashtra Budget For OBCs: ओबीसींसाठी दहा लाख घरे बांधून देण्याच्या घोषणेचे ओबीसी नेत्यांकडून स्वागत !

Farmers : शेतीविकासावर मोठ्या प्रमाणात भर दिला गेला आहे.
Ashok JIvtode
Ashok JIvtodeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Budget News: शिंदे फडणवीस राज्य सरकारने काल सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्याचा सर्वांगीण विकास साधणारा हा अर्थसंकल्प आहे. शेती, मुली व महिला, अंगणवाडी सेविका, असंघटित कामगार, आरोग्य क्षेत्र, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी, ओबीसी, तथा नदीजोड, सिंचन, रस्ते आदी भौतिक सुविधांसाठी भरीव योजनांचा विचार या अर्थसंकल्पात केलेला असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी दिली.

इतर मागासवर्गीयांसाठी पहिल्यांदाच दहा लाख घरे बांधणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात केलेली आहे. त्यामुळे शेतीविकास व ओबीसी विकास साधणारा अर्थसंकल्प आहे. शेतीविकासावर मोठ्या प्रमाणात भर दिला गेला आहे. शेतकऱ्यांसाठी महाकृषी विकास अभियान, राज्याच्या विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची स्थापना, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा काढता येईल, शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार, या चांगल्या गोष्टी सरकारने दिल्या आहेत.

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानात वाढ, सेंद्रिय शेतीला चालना, उपग्रह आणि संगणकाची मदत घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ई-पंचनामे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, शेतकऱ्यांच्या वार्षिक मदतीत वाढ, एकात्मिक पीक आधार आराखडा, मागेल त्याला शेततळे व ठिबक, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची घोषणा,

मच्छीमारांसाठी ५० कोटींचा मत्स्यविकास कोष, नदीजोड प्रकल्प, गोसीखुर्दसाठी १५०० कोटीचा निधी, रखडलेले जलप्रकल्प पूर्ण करणार, जलयुक्त शिवार योजना दोनची सुरुवात, मुलींसाठी लेक लाडकी योजना, पिडीत महिलांसाठी शक्तीसदन, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतील निधीत भर टाकल्याने राज्याला बळकटी मिळणार आहे.

ज्येष्ठांना वैद्यकीय सुधारणा, आपला दवाखाना राज्यभर, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, साखळी व्यवस्थापन प्रणाली, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, आदी योजनेत वाढ, आदिवासी आश्रम शाळांना आदर्श शाळा करण्याची योजना, टॅक्सी, रिक्षाचालक, असंघटित कामगार यांच्या विकासासाठी महामंडळाची स्थापना,

रस्ते आणि पुलांच्या प्रकल्पासाठी निधी, मातोश्री ग्राम समृद्धी पांदण योजनेत नव्या योजनांचा समावेश, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा पुढील टप्पा सुरू, बिरसामुंडा, संत सेवालाल जोडरस्ते योजना, गोंडवाना विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणार, आदी सर्वसमावेशक भरीव अशा विकास कामांचा हा अर्थसंकल्प असल्याचे जीवतोडे म्हणाले.

Ashok JIvtode
Chandrapur News: जिल्हा बॅंकेची नोकर भरती पुन्हा अडचणीत, संचालक मंंडळाला जबर धक्का...

राज्यातील सर्व कल्याणकारी योजनेत केलेली भरीव वाढ व नवीन योजनांची निर्मिती या अर्थसंकल्पात (Budget) सांगण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पात पहिल्यांदा इतर मागासवर्गीयांचा (OBC) विचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे, त्यामुळे शिंदे फडणवीस (Devendra Fadanvis) राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प राज्याला नवीन दिशा देणारा ठरणार आहे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com