Gondia : धुळे एसआरपीएफ पोलिसाविरुद्ध सालेकसात गुन्हा दाखल; बंदूक घेत दिली...

Life Threat : मद्यप्राशन केल्यानंतर अधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी; पोलिस दलात खळबळ
SRPF Dhule Police at Gondia.
SRPF Dhule Police at Gondia.Sarkarnama
Published on
Updated on

Naxal Duty : दारूचा अंमल चढल्यानंतर माणसाचे स्वत:वर नियंत्रण राहात नाही. असाच एक प्रकार गोंदियात घडला आहे. गोंदियात माओवाद्यांचा बिमोड करण्यासाठी स्थापन भारत बटालियनच्या जवानाने मद्याच्या नशेत थेट वरिष्ठांना आत्महत्येची धमकी दिली. बंदूक जमा करा, अन्यथा डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या करेल, अशी थेट धमकी त्याने अधिकाऱ्यांना दिली आहे. या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश वामनराव साळी (वय 46) असे या जवानाचे नाव आहे. सालेकसा येथे त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-६ धुळे येथील बी. कंपनीच्या प्लाटून क्रमांक- दोन गोंदियात तैनात आहे. या प्लाटूनमधील पोलिस शिपाई सुरेश साळी याला जिल्हाअंतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र पोलिसकॅम्प पिपरीया येथे तैनात करण्यात आले आहे. शनिवारी (ता. 6) ड्युटीवर गैरहजर राहिल्यामुळे त्याला वरिष्ठांनी याबाबत खुलासा सादर करण्यास सांगितले.

SRPF Dhule Police at Gondia.
Gondia : बिरसी विमानतळाचा तिढा सुटता सुटेना, आता परसवाडाचे गावकरी म्हणतात...

वरिष्ठांनी खुलासा का मागितला म्हणून सुरेश साळीचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात तो आपल्या हातातील बंदूक घेऊन पोलिस उपनिरीक्षक एकनाघ डक यांच्याकडे गेला. आपली रायफल जमा करा अन्यथा याच रायफलने स्वतःचा जीव घेईन, अशी धमकी त्याने डक यांना दिली. घटना घडली त्यावेळी सुरेश मद्यप्राशन करून होता. सुरेशच्या या धमकीमुळे खळबळ उडाली. एसआरपीएफ सहकाऱ्यांनी त्याच्या जवळून राइफल घेत लागलीच पोलिस स्टेशन सालेकसा गाठले. पोलिस उपनिरीक्षक पुनमचंद उत्तमसिंग सुलाने (वय 45) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी सुरेशविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सततची ड्यूटी, कामाचे वाढलेले तास, ताण, धकाधकीचे जीवन, अनियमित आहार आणि अनेक दिवस कुटुंबापासून दूर दुर्गम भागात तैनात राहावे लागत असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. अशात पोलिस दलातील अनेक जण मद्याच्या आहारी जात असल्याचे दिसत आहे. अनियमितपणा आणि कामाच्या ताणामुळे पोलिसांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होत आहे. पोलिसांना कमी वयातच मधुमेह, निद्रानाश, हृदयरोग, रक्तदाब अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे एका वैद्यकीय अहवालातून पुढे आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारकडूनही पोलिसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. लोकसंख्येच्या आधारावर पोलिस दलात पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे सण, उत्सव, कौटुंबिक जबाबदाऱ्या सोडून पोलिसांना सतत ड्युटीवर तैनात राहावे लागत आहे. याच तणावातून कदाचित सुरेशने हे कृत्य करावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. येथे पोलिसांवर कामासोबतच माओवादी कारवांवर वचक ठेवण्याची मोठी जबाबदारी असते. गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती तर या तीन जिल्ह्यांपेक्षाही वेगळी आहे. गडचिरोलीत ड्युटी करताना माओवाद्यांच्या गोळ्या कोणत्या दिशेने येतील, याचा नेम नसतो. गोंदिया व गडचिरोली हे दोन जिल्हे लागूनच आहेत. या जिल्ह्यांमध्ये दुर्गम भाग मोठ्या प्रमाणावर आहे. अशा भागांमध्ये चहा तर दूर पिण्यासाठी साधे पाणीही प्रसंगी मिळत नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यातील पोलिसांनी ड्यूटी मोठी आव्हानात्मक मानली जाते.

Edited by : Prasannaa Jakate

SRPF Dhule Police at Gondia.
Gondia : रोखण्याऐवजी बापानेच गुन्ह्याकडे लोटले; वादातून मुलांच्या मित्राला कायमचे संपविले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com