Old Pension : विधानपरिषदेत पेटला जुनी पेन्शनचा मुद्दा; चर्चा झालीच पाहिजे, म्हणत सदस्य आक्रमक !

Nilam Gorhe : सभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना ताकीद दिली.
Agitation for Old Pension Scheme
Agitation for Old Pension SchemeSarkarnama

The state-wide strike has brought life to a standstill : राज्यभरातील कर्मचारी व शिक्षक आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या राज्यव्यापी संपाने जनजीवन थांबले आहे. अनेक कार्यालये आज उघडली गेली नाहीत. आज विधानपरिषदेत हा मुद्दा चांगलाच पेटला. विरोधी पक्षातील सदस्यांनी यावर सरकारने बोलावे, अशी मागणी करीत सभागृह डोक्यावर घेतले.

सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालणे सुरू केले. काहींनी वेलमध्ये येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना ताकीद दिली. गदारोळ वाढत गेल्याने सभापतींनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. आमदार कपिल पाटील, आमदार अभिजित वंजारी, आमदार विक्रम काळे यांच्यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्रात संप सुरू असताना सरकारने बोलले पाहिजे, सरकार बोलत का नाही, असा प्रश्‍न दानवेंनी केला.

जुनी पेंशनवर चर्चा करण्याचा विरोधी पक्षाची मागणी सभापतींनी फेटाळून लावली. त्यानंतर सदस्य आक्रमक झाले. आमदार विक्रम काळे यांनी सभात्याग करण्याची भूमिका मांडली. पण त्यांनी लगेच सभात्याग केला नाही. त्यावर सभापतींनी त्यांना म्हणाल्या की, बरे झाले तुम्ही सभात्याग केला नाही. कारण सभागृहात राहूनच प्रश्‍न सुटू शकतात. जुनी पेन्शनचा तिढा सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही.

आज राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. कारण राज्यातील कर्मचारी संपावर गेले आहेत. २५ तारखेनंतर येथे असलेले अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा संपात सहभागी झालेले दिसतील. त्यामुळे चर्चा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार अभिजित वंजारी यांनी लावून धरली. लगेच त्यांच्या साथीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उभे झाले. ते म्हणाले, या विषयावर चर्चा होऊन गेलेली असली तरी आता महाराष्ट्रव्यापी संप सुरू झाला आहे. जनजीवन थांबले आहे. त्यामुळे सरकारची बोलण्याची तयारी असलीच पाहिजे.

Agitation for Old Pension Scheme
Old Pension : जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या पक्षालाच मदत करणार १५ कोटी कर्मचारी !

या सर्व गदारोळात सभापतींनी प्रश्‍नोत्तराचा तास सुरू केला. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मल्लखांबासंदर्भात प्रश्‍न केला. त्यावर गदारोळातच मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) उत्तर देत होते. इकडे ‘एकच मिशन - जुनी पेन्शन...’च्या घोषणांनी विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले आणि कामकाज होणे अवघड होऊन बसले. तेव्हा सभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब करीत असल्याची घोषणा केली.

पु्न्हा सभागृह सुरू झाल्यावरही ‘एकच मिशन - जुनी पेन्शन...’च्या घोषणा सुरूच होत्या. विरोधकांचा गदारोळ कायम होता. सभापती वारंवार त्यांना सूचना देत होत्या. पण सदस्य ऐकण्याच्या मनःस्थिती दिसले नाही. त्यांचा गदारोळ सुरूच होता. दरम्यान अंबादास दानवे यांनी पुन्हा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन संपासंदर्भात भूमिका मांडावी, अशी मागणी केली. संप राज्यासाठी चांगला नाही. त्यामुळे सर्वच कामे ठप्प होणार असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com