Rajendra Zade यांना ‘जुनी पेन्शन’ विजयी करणार, कपील पाटलांचा दावा...

Devendra Fadanvis यांनी जुनी पेंशन योजना देणार नाही, असे जाहीरपणे स्पष्ट केले.
Kapil Patil and Rajendra Zade
Kapil Patil and Rajendra ZadeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Teachers Constituency Election : नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) जुनी पेन्शनच्या मागणीसाठी निघालेला मोर्चा सर्वांनीच बघितला. ५० टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षक सन २००५च्या नंतर सेवेत रुजू झालेले आहेत. जुनी पेन्शन देणार नाही, असे फडणवीसांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे हा जुनी पेन्शनचा मुद्दा आमचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना विजयी करणार आहे, असे शिक्षक भारती संघटनेचे नेते कपील पाटील आज येथे म्हणाले.

नागपूर (Nagpur) विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जुनी पेंशन योजना हाच प्रमुख मुद्दा राहणार आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जुनी पेंशन योजना देणार नाही, असे जाहीरपणे स्पष्ट केल्याने शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांचा विजय निश्चित झाला असल्याचा दावाही आमदार कपील पाटील (Kapil Patil) यांनी केला.

हिवाळी अधिवेशनातच जुन्या पेंशन योजनेचा प्रश्नावर फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. भाजप सरकारने जुनी पेंशन योजना बंद केली, दुसरीकडे अनुदानही देणे बंद केले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठा असंतोष आहे. किमान ५० टक्के शिक्षक मतदार २००५च्या नंतर नोकरीला लागलेले आहेत. ते सर्वच आम्हाला मतदान करतील. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आणि भाजपने समर्थन जाहीर केलेले उमेदवार नागोराव गाणार यांच्यासाठी नुकतीच रेशीमबाग येथे बैठक झाली.

प्रचारादरम्यान काही वादग्रस्त मुद्द्यांवर मौन पाळवे लागते किंवा सोयीची भूमिका घ्यावी लागते. मात्र या बैठकीतही फडणवीस यांनी जुनी पेंशन योजना लागू करणार नाही, असे जाहीरपणे सांगितले. त्यामागचे त्यांचे राजकीय गणित माहीत नाही, परंतु त्यांची रोखठोक भूमिका आमच्या पथ्यावर पडणारी असल्याचे कपील पाटील यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र झाडे उपस्थित होते.

Kapil Patil and Rajendra Zade
आमदार कपिल पाटील म्हणाले, खोटा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांना विरोध करा...

काँग्रेसने शब्द फिरवला..

शिवसेनेने उमेदवारी अर्ज मागे घेऊन शब्द पाळला. आपण या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आमचा विजय आणखीच सोपा झाला आहे. कोणाला समर्थन द्यायचे, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने आम्हाला शब्द दिला होता. पदवीधरमधून निवडून आलेले आमदार अभिजित वंजारी हेसुद्धा त्यावेळी उपस्थित होते. राजकारणात शब्दाला महत्त्व असते. कदाचित काँग्रेस नेत्यांच्या काही अडचणी असतील, असेही कपील पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com