Nagpur Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. त्यासाठी विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनीही त्याचा तोड शोधून ठेवला आहे. कर्नाटक सीमावादासह सध्या जे मुद्दे गाजत आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहे. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर तडकाफडकी राजीनामा देणारे उद्धव ठाकरे अधिवेशनाला येणार की नाही, यामध्ये कालपर्यंत संभ्रम होता. पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबतचा संभ्रम दूर केला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरला (Nagpur) येत आहेत. त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, असे अजित दादा (Ajit Pawar) म्हणाले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. उद्धव ठाकरे अधिवेशनात (Assembly Winter Session) येणार का? असा प्रश्न विचारला असता ते उद्याच येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कोरोनामुळे दोन वर्षे हिवाळी अधिवेशन नागपुरात होऊ शकले नाही.
कोरोना आणि राज्यात सत्तापालट झाली तेव्हापासून उद्धव ठाकरे नागपूरकडे फिरकले नाहीत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते नागपूरला येणार होते. मात्र, त्यानंतर नागपूर तसेच विदर्भातील शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका त्यांनी मुंबईतच घेतल्या. मध्यंतरी एका सभेसाठी ते बुलढाणा येथे येऊन गेले. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला होता. त्यांनी आपला राजीनामा विधान परिषदेचे सभापती यांच्याकडे पाठवला होता. मात्र, संख्याबळ कमी होऊन विधान परिषदेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपद जाण्याचा धोका दिसताच ठाकरे यांनी राजीनामा परत घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.