Ordnance Factory Blast : ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाकडून 'त्या' स्फोटाची चौकशी सुरू !

Bhandara - Jawaharnagar : या स्फोटात प्रोसेस करणाऱ्या इमारतीचे छत पूर्णपणे उडाले असल्याची माहिती सामोर आली आहे.
Ordnance Factory
Ordnance FactorySarkarnama
Published on
Updated on

Ordnance Factory Blast : भंडारा शहरालगत जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डनन्स फॅक्टरी) भीषण स्फोटाची घटना आज सकाळी 08.30 वाजता घडली. झालेल्या दुर्घटनेत एक कर्मचारी ठार झाला. स्फोट इतका भीषण होता, की त्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. जवाहरनगर आयुध निर्माणी येथील RDX-PRO च्या CX-232 Sppining मध्ये स्फोट होऊन अविनाश मेश्राम (5740/51/RX) वय 52 वर्षे यांचा जागेवरच मृत्यू झाला.

या स्फोटात प्रोसेस करणाऱ्या इमारतीचे छत पूर्णपणे उडाले असल्याची माहिती समोर आली आहे. अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामावर आले होते. ही शिफ्ट पहाटे 6 वाजता सुरू झाली होती. सीएक्स विभागात बारुदचे कोट तयार करण्याचे काम केले जाते, तिथं हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी मृतक अविनाश मेश्राम हे एकटेच होते. त्यामुळे त्यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. या स्फोटामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

Ordnance Factory
Bhandara Illegal Recovery : बनावट पावती प्रकरणाचे गोतस्करी कनेक्शन? त्या ग्रामपंचायत सदस्यावर प्रकरण शेकणार?

भंडारा शहरालगत जवाहरनगरात असलेल्या आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डनन्स फॅक्टरी) हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आयुध निर्माणी प्रशासनाने या घटनेची गंभीर दाखल घेत या आयुध निर्माणी महाप्रबंधकांच्या आदेशाने अपर महाप्रबंधकांच्या नेतृत्वात तीनसदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून या घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सोबतच या समितीला अहवाल तत्काळ मागितला आहे. अहवालानंतरच या स्फोटाचं नेमकं कारण पुढे येईल. भविष्यात अशी दुर्घटना कशी टाळावी, याचे उपाय केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अन् अपघाताने कुटुंबाचा कमावता माणूस गेला...

मृतक अविनाश मेश्राम हे कुटुंबातले एकुलते कमावते व्यक्ती होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली इतका परिवार आहे. दरम्यान, ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाकडून अपघाताचा क्लेम, तसेच मृतक कर्मचाऱ्याचे पेन्शन आदी लवकर मिळावी, त्याकरिता आवश्यक कार्यालयीन कामाला सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

महिनाभराची दुसरी घटना...

भंडाऱ्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत 2 जानेवारीच्या पहाटे मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात तीन कामगार जखमी झाले होते. सोबतच घटनेच्यावेळी कंपनीत काम करणाऱ्या इतर आणखी आठ कामगारांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुदैवाने या स्फोटात कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी अचानक झालेल्या या मोठ्या स्फोटामुळे चांगलीच तारांबळ उडाली. स्टील कंपनीत पहाटे झालेला हा स्फोट एवढा भयानक होता, की कंपनीतील जवळपास असलेला परिसरदेखील हादरला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर आज परत एकदा हा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

Edited By : Atul Mehere

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com