Bachchu Kadu News : ''...अन्यथा मुख्यमंत्री पद सोडा, विरोधी पक्षनेतेपदही हातातून जाईल!''; बच्चू कडूंचा राष्ट्रवादीला चिमटा

Maharashtra Politics: ...हे मूर्खपणाचं लक्षण!
Bachchu Kadu News
Bachchu Kadu NewsSarkarnama
Published on
Updated on

Amravati News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टरबाजी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असा दावा केल्यानं राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फटकारलं आहे.

आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील बाजार समितींच्या निवडणुकांवर भाष्य करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला भावी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवरून निशाणा साधला आहे. कडू म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची चर्चा होत असली तरी आधी त्यांच्यातील गटबाजी थांबवणे गरजेची आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही चर्चा होत असली तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक गट तर दुसरीकडे आमदार जयंत पाटील यांचा एक गट आहे.

Bachchu Kadu News
Renapur APMC Result News : लातूरनंतर रेणापूरातही देशमुखांचाच डंका, बिनविरोधसह सर्व १७ जागांवर विजय..

त्यामुळे ही गटबाजी आधी थांबवणे ही राष्ट्रवादी(NCP)साठी काळाची गरज आहे. कारण भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरबाजी राज्यभरात आली असली तर या पक्षातील गटबाजी आधी थांबवणे त्यांच्यासाठी महत्वाची आहे. एकीकडे ही भावी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यत चालू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पक्षातील गटबाजी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा राजकारणामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पद सोडा, विरोधी पक्षनेतेपदही जाईल असा चिमटाही बच्चू कडू यांनी लगावला आहे.

Bachchu Kadu News
Lakhandur Market Committee: पटोलेंना 'होमपीच'वरच खिंडीत गाठण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादीला सोबत घेतलं,तरीही काँग्रेसनं मैदान मारलंच..!

हे मूर्खपणाचं लक्षण...

राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका होत असल्यामुळे राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. कुठे महाविकास आघाडी, तर कुठे युतीच्या जागांवर बाजार समितीच्या जागा, तर कुठे भाजपसोबत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यामुळे या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये एकाच पक्षाला विजयी ठरवणे म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण आहे असा टोला त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com