अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार, मनसे नेत्या रिटा गुप्तांनी दिला इशारा...

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी पीडितेची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
Rita Gupta MNS
Rita Gupta MNSSarkarnama
Published on
Updated on

भंडारा : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार झाला असून या प्रकरणी पोलिसांनी (Police) दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी हा अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता (Rita Gupta) यांनी पीडितेची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

प्रसार माध्यमांशी बोलताना रिटा गुप्ता म्हणाल्या, ती महिला अजूनही बोलण्याच्या स्थितीत नाही. तिची मावशी आणि बहीण तेथे होती. त्यांच्याशी आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर सांगितले की, तिची प्रकृती अजूनही बरी झालेली नाही. पण सुधारणा आहे. आज कुठे ती काही तरी खाऊ शकत आहे. तिच्या नातेवाइकांना मी माझा मोबाईल नंबर दिला आणि सांगितले की. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतरही काही इतर उपचारांची गरज लागली, तर आम्ही त्यांना मदत करू.

तिसरा आरोपी अजूनही पकडला गेला नाहीये. त्यासाठी पोलिसांना सांगितले की, लवकरात लवकर तिसऱ्या आरोपीला अटक करा. कारण फास्ट ट्रॅक न्यायालयात हे प्रकरण चालणार आहे. गेल्या तीन दिवसात १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. त्याआधी ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे ती महिला पोलिस ठाण्यात गेली होती. पोलिसांनी तिने आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तिला हाकलून लावले आणि त्यानंतर तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आले. हा प्रकार अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारा आहे, असेही गुप्ता म्हणाल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आजच रस्त्यावर उतरणार होती. पण पोलिसांकडून आश्‍वासन देण्यात आले की, तिसऱ्या आरोपीचे स्केच जारी केले आहे आणि लवकरात लवकर आरोपिला गजाआड करण्यात आम्हाला यश मिळेल. त्यामुळे आम्ही आंदोलन सध्या स्थगित केले असल्याचेही रिटा गुप्ता म्हणाल्या. या प्रकरणाचा तपास आता एस.आय.टी. मार्फत केला जात आहे. त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर अटक होईल अशी अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.

Rita Gupta MNS
सरकार नाही म्हणून काय झाले? ‘आम्ही आहोत ना...’ म्हणत शेतकऱ्यांसाठी सरसावली मनसे !

शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश..

गोंदिया जिल्ह्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून मनसेच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील १००च्या वर महिलांनी मनसेच्या प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. राज्यात शिंदे गट आणि भाजपची सरकार असताना या सरकारला राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेची काळजी नाही. अशा परिस्थितीत महिलांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण कुणाच्या विश्‍वासावर साजरा करावा, असा प्रश्न महिलांना पडला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून गोंदिया जिल्हातील शेकडो महिलांनी मनसेत प्रवेश केला, असल्याचे रिटा गुप्ता म्हणाल्या. मनसे विद्यार्थी सेनादेखील या मेळाव्यात सहभागी झाली होती. यावेळी हेमंत गडकरी तसेच गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख राहुल बलवार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com