Parinay Fuke News : 'झाशीनगर'साठी परिणय फुकेंनी गाठली दिल्ली अन्...

Jashinagar Upsa Irrigation Scheme : वन विभागाच्या कायद्यामुळे झाशीनगर उपसा सिंचन योजना अनेक वर्षापासून थंड बस्त्यात पडली होती.
Parinay Fuke
Parinay FukeSarkarnama

Bhandara District News : अनेक वर्षांपासून वन कायद्यात अडकलेल्या अडकलेल्या भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेली झाशीनगर उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिल्ली गाठली. दरम्यान झाशीनगर उपसा सिंचन योजना टप्पा 1 ला मान्यता मिळाली असून भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

विशेष म्हणजे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव, देवलगाव, येरंडी, मुंगली, खोली या पाच गावांना याचा फायदा होणार आहे. भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी पावसाळीसह उन्हाळी धान घेतात. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगांव अर्जुनी तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्थेची आवश्यकता लक्षात घेता सरकारने झासी नगर उपसा सिंचन योजना तयार करण्याची निश्चित केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parinay Fuke
Lok Sabha Election 2024 : उघड पंगे घेणे पडणार महागात; नवनीत राणांना सामूहिक विरोध

वन विभागाच्या कायद्यामुळे झाशी नगर उपसा सिंचन योजना अनेक वर्षापासून थंड बस्त्यात पडली होती. जंगलातील प्रकल्पाचे काम राखीव, एमपीडब्ल्यू आणि नवेगाव-नागझिरा आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केल्यामुळे वनक्षेत्राकडे पाठवलेला प्रस्ताव मान्य होऊ शकला नाही. जंगलात जाण्यापूर्वी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आता 4 हजार 225 हेक्टर जमिनीला सिंचन देणारी ही उपसा सिंचन योजना अद्यापही अपूर्ण असल्याने अनेक गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहिले आहेत.

वनक्षेत्रात वारंवार बदल केल्याने झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम रखडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रामपुरी, चुटिया, तिडका, बसबोडन, झाशी नगर, धाबेपवनी, धाबे टेकडी, येरंडी ही गावे अजूनही सिंचनापासून वंचित राहिली होती. दरम्यान ही बाब लक्षात घेत माजी मंत्री डॉ. फुके यांनी या सर्वांच्या संयुक्त प्रस्तावासाठी एफआरए प्रमाणपत्र केएमएल फाईल जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवत हा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्ली वन मंत्रालयाकडे पाठविण्याचे ठरविले.

फुके यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून नागपूर वनविभाग कार्यालयाकडे पाठवला. या प्रस्तावाबाबत त्यांनी स्वतः दिल्ली गाठून वन मंत्रालयाकडे जाऊन अधिकाऱ्यांसमोर अडचणी मांडल्या आहे. त्याची फलश्रुती म्हणून येत्या 8 मार्च रोजी पाच गावांतील धान उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाकांक्षी झाशी नगर उपसा सिंचन योजना टप्पा-1 अंतर्गत उन्हाळी पिकांचा लाभ देण्यासाठी पाच गावांना सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा लाभ देण्यात येणार आहे.

Parinay Fuke
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या ‘शुअर शॉट विनिंग सीट’वरच्या नितीन गडकरींचे नाव पहिल्या लिस्टमध्ये का नाही?

8 मार्च रोजी नवेगावबांध धरणावर माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे. याचा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव, देवलगाव, येरंडी, मुंगली, खोली या पाच गावांना होणार आहे. या पाच गावांना उन्हाळी सिंचनाचा लाभ देण्याबरोबरच आगामी खरीप हंगामात 27 गावांतील शेतकऱ्यांना झाशीनगर उपसा सिंचन योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com