Nana Patole On Gadkari: ...तर नितीन गडकरी होतील पंतप्रधान, नानांनी सांगितला 'फाॅर्म्युला' !

Wardha District Politics: वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत नऊ दिवस ही यात्रा चालणार आहे.
Narendra Modi, Nana Patole and Nitin Gadkari.
Narendra Modi, Nana Patole and Nitin Gadkari.Sarkarnama

Wardha District Political News : भारतीय जनता पक्षाने आता सर्वे केला. त्यात २०२४ मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना ५० खासदार त्यांना कमी पडत आहेत. म्हणून गडकरी आता थोडे उभे झाले. गडकरी आणि मोदींचं भांडण सुरू झालं आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणाले. (The fight between Gadkari and Modi has started)

नाना पटोले यांनी काल (ता. ३) वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. या दरम्यान ते विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमधील यात्रांना हजेरी लावणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत नऊ दिवस ही यात्रा चालणार आहे. कालच्या यात्रेचा समारोप आर्वी येथे सायंकाळी झाला. त्यावेळी जाहीर सभेत पटोले बोलत होते. ते म्हणाले, नितीन गडकरी पूर्वी काय बोलायचे आणि आता काय बोलतात?

तलावात विमान उतरवेल, हवेत बस उडवेन, अशाच घोषणा पूर्वी गडकरी (Nitin Gadkari) करत होते. मागील काळात गडकरी थोडे दबले होते आता थोडेसे वर उठले. कारण ५० खासदार कमी पडले तर मी प्रधानमंत्री बनेल, असं त्यांचं सुरू झालंय. नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि नितीन गडकरी यांच्यात भांडण सुरू झाले आहे. आत्ताच्या सर्वेमध्ये भाजपला कमी जागा मिळत आहेत. पुढे डिसेंबरमध्ये सर्वे होईल तेव्हा भाजप आणखी खाली आलेली असेल, अशी टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेच्या पहिल्या दिवशी आर्वी येथे पोचल्यानंतर सभा घेण्यात आली. सभेला नाना पटोले, सुनील केदार, अमर काळे यांची उपस्थिती होती. या सभेत नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. पुढील निवडणुकीत इव्हीएम वगैरे काही चालणार नाहीय. काँग्रेस ही मतविभाजनामुळे पडलीय. पण पुढील निवडणुकीत मतविभाजन होणार नाही. मतविभाजन होऊ नये याच पूर्ण प्लॅनिंग केलं आहे, असे ते म्हणाले.

Narendra Modi, Nana Patole and Nitin Gadkari.
Praful Patel Vs Nana Patole : प्रफुल्ल पटेल-नाना पटोले यांच्यात पुन्हा शाब्दिक वॉर; नैतिक-अनैतिकेतून वार-पलटवार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवणं, तरुणांना, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा संकल्प काँग्रेसचा आहे. चुकून पुढील निवडणुकीत मतविभाजन झालं तर आपल्याला माफ करायला कोणीच राहणार नाही. ज्यांनी मतविभाजनाची दुकानं लावली होती, ती दुकानं आता थंड पडली आहेत.. नागरिकांना आता सर्व कळतंय, असेही नाना पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com