Patur APMC Result : राष्ट्रवादीच्या पॅनलला भाजप-सेना-वंचितने चारली धूळ !

APMC : नाराज इच्छुकांना राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाऊन शेतकरी पॅनल उभे केले.
APMC Patur
APMC PaturSarkarnama

श्रीकृष्ण शेगोकार

Akola District Patur APMC Election Result : अकोला जिल्ह्यातील पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत सहकार पॅनल लढवले. तर या पॅनलमध्ये उमेदवारी न मिळालेल्या नाराज उमेदवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाऊन शेतकरी पॅनल उभे केले. (Loyalists won this match.)

राष्ट्रवादी आणि भाजप-सेना-वंचितमध्ये झालेल्या या मुकाबल्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पॅनलचा पार धुव्वा उडाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलला केवळ एकच जागा मिळाली. तर सहकार पॅनलने १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

स्थानिक स्वराज्य संस्थेत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १७ संचालक पदाच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत (Elections) सहकार पॅनलने १७ उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी पंधरा उमेदवार प्रत्यक्ष निवडून आले. एक उमेदवार आधीच अविरोध झाला होता.

१६ उमेदवार सहकार पॅनलचे विजयी झाल्यामुळे पुन्हा एकदा पातूर बाजार समितीत सहकार पॅनलचा दबदबा कायम राहिला. तर शेतकरी परिवर्तन पॅनलने सर्व मतदार संघात १५ उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी ग्रामपंचायत मतदार संघातून मतदारांनी एकाच उमेदवाराला पसंती दिली. त्यामुळे सहकार पॅनलविरुद्ध शेतकरी परिवर्तन पॅनल यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढाईत शेतकरी परिवर्तन पॅनलचा सहकार पॅनलने पराभव करून बाजार समितीत (APMC Election) पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला.

APMC Patur
Buldhana District APMC: बाजार समित्यांमध्ये आघाडीचा डंका अन् सत्ताधाऱ्यांना धोक्याची घंटा !

सहकार पॅनलने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी तर शेतकरी (Farmer) परिवर्तन पॅनलने आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. ग्रामीण मतदारांना मतदान करणे सोयीचे जावे यासाठी चार चाकी वाहनांतून ने-आण करण्याची सोय केली होती. त्यामुळे मतदानही चांगले म्हणजे ९३ टक्के झाले. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली मतमोजणी दरम्यान बरेच आक्षेप आल्यामुळे मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

विजयी उमेदवार - सेवा सहकारी संस्था मतदार संघ - महल्ले राजेश विष्णुपंत, देशमुख राजेंद्र नारायणराव, राठोड शंकर बंडू, शिंदे मनोहर नामदेव, अंधारे चंद्रकांत शालिग्राम, कचाले अरुण मारोती, उजाडे दीपक सुरेंद्रकुमार. महिला प्रतिनिधी मतदारसंघ- देवकते सिंधू साहेबराव, खोंड संगिता संजय. इतर मागासवर्ग मतदार संघ- महल्ले गोपाल गणपतराव. भटक्या जाती / विमुक्त जमाती मतदारसंघ- चव्हाण चरणकुमार लक्ष्मण.

APMC Patur
Arni APMC Election Analysis : ना पक्ष, ना आघाडी, जात ठरली सगळ्यात भारी !

ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदारसंघ- तायडे माणिकराव देवराव, चवरे गोटीराम तुकाराम. अनुसूचित जाती /जमाती मतदारसंघ- गवई राष्ट्रपाल दादाराव. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघ- भाकरे राजेश रामचंद्र. व्यापारी / अडते मतदार संघ- टप्पे अर्जुन राजाराम, मोहसीन खा शफीउल्ला खान. हमाल मापारी मतदारसंघ- शेख मुख्तार शेख नजीम.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com