Prashant Pawar On Deshmukh: अनिल देशमुख अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार, शहराध्यक्ष पवारांचा दावा !

Prashant Pawar Statement: पवारांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
Prashant Pawar and Anil Deshmukh
Prashant Pawar and Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेऊन एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. याशिवाय विविध दावे या गटांकडून करण्यात येत आहे. अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी असाच एक खळबळजनक दावा केला आहे.

आज (ता. ३१) सकाळी साम टीव्हीशी बोलताना प्रशांत पवार म्हणाले, माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख सध्या शरद पवार गटात असले तरी आगामी विधानसभा निवडणूक ते आमच्या गटाकडून लढणार आहेत. पवारांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अनिल देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा शंकेच्या नजरांनी बघितले जाऊ लागले आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही अनिल देशमुख यांची भूमिका संशयास्पद होती. ते कुंपणावर असल्याची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. पण त्यानंतर त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन मी कुठेही जाणार नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार आहे, असे घोषित केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते आमदार झाले. आता अजित पवार गटाचे प्रशांत पवार यांच्या दाव्याने अनिल देशमुख पुन्हा चर्चेत आले आहेत.

दोन सप्टेंबरला मेळावा..

अजित पवार गटाचा विदर्भातील पहिला मेळा दोन सप्टेंबरला ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात येथील वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहे. हा मेळावा म्हणजे शक्तिप्रदर्शन असणार आहे. शहराध्यक्ष पवार यांच्या नेतृत्वात मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी या मेळाव्यातून होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Prashant Pawar and Anil Deshmukh
Prashant Pawar News: सनदशीर मार्गांनी आंदोलन करणारे ब्लॅकमेलर कसे? प्रशांत पवार संतापले...

अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या मेळाव्यांची सुरुवात उपराजधानी नागपुरातून (Nagpur) व्हावी, अशी ज्येष्ठ नेत्यांची इच्छा आहे. त्यानुसार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्या नेतृत्वात नागपुरात मेळावा होणार आहे. त्यानंतर वर्धा, अमरावती व चंद्रपूर येथे मेळावे घेण्यात येतील. त्यानंतर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यांदरम्यान काही मतदारसंघांवर दावे करण्यात येणार आहेत, असेही प्रशांत पवार यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com