Pension : खासदार धानोरकर म्हणाले, ‘त्या’ माजी खासदारांचे पेन्शन बंद करा !

Balu Dhanorkar : राज्यात जुन्या पेन्शनचा मुद्दा पेटला असताना या मागणीला महत्व आले आहे.
Balu Dhanorkar
Balu DhanorkarSarkarnama

Chandrapur's Congress MP Balu Dhanorkar News : भारत सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे. यामध्ये आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक माजी खासदारांनाही निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात आहे. यामध्ये माजी खासदारांची आर्थिक स्थिती बघून निवृत्ती वेतन देण्यात यावे, अशी मागणी चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. (Pension should be given to former MPs looking at their financial status)

यासंदर्भात खासदार धानोरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रही पाठविले आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत ‘जुनी पेन्शन’चा मुद्दा पेटला आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपाचा आज तिसरा दिवस आहे. यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. सन २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ साली सुरू असलेली पेन्शन द्यावी की नाही, यावरून विविध मतप्रवाह आहेत.

जुनी पेन्शन देता येणार नाही. कारण असे केल्यास राज्याच्या तिजोरीवर मोठा बोझा पडणार आहे, असे वक्तव्य हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर कर्मचारी अधिकच जिद्दीला पेटले आणि त्यांनी लढा अधिक तीव्र केला. आम्हाला जुनी पेन्शन देऊ शकत नसाल, तर सर्व आमदार आणि खासदारांचेही पेन्शन बंद करा, अशीही मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. सरकारने अद्याप ती मान्य केलेली नाही.

अशा परिस्थितीत मात्र कॉंग्रेसचे (Congress) महाराष्ट्रातले (Maharashtra) एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी माजी खासदारांचे पेन्शन बंद करण्याची मागणी केली आहे. हे करताना त्यांची आर्थिक स्थिती बघावी, असेही त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना पत्रही दिले आहे. पत्रामध्ये ते म्हणतात, भारतीय लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण चार हजार ७९६ माजी खासदार आहेत. त्यांना दरवर्षाला ५० कोटी रुपयांची रक्कम पेन्शनच्या माध्यमातून प्रदान केली जाते.

Balu Dhanorkar
Balu Dhanorkar on RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वारसा नष्ट करायचा आहे...

जवळपास ३०० माजी खासदारांचे आश्रित परिवारदेखील सहभागी आहेत. माजी खासदारांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनामध्ये उद्योजक राहुल बजाज, संजय दालमिया, बहन मायावती, सिताराम येचुरी, मनी शंकर अय्यर, अभिनेत्री रेखा, अभिनेते चिरंजीवी आणि अनेक मोठ्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या माजी खासदारांची निवृत्ती वेतनाची रक्कम बंद करण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com