PM Modi Yavatmal Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सामान्य प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल !

Buldhana : बुलढाणा बस स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली झाली आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Yavatmal Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यवतमाळ येथे आज (ता. 28) जाहीर सभा होत आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना ने-आण करण्यासाठी हजारो बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाला येण्यासाठी महिलांना गावातच एसटी महामंडळाची बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून एसटी महामंडळाच्या 150 बसेस यवतमाळकडे रवाना करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने एका सभेसाठी बसेस बाहेर पाठविण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रवासी सेवा पूर्णतः कोलमडली आहे. बुलढाणा बस स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.

या कार्यक्रमाला गर्दी खेचण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच पळापळ सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेच बुक करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एकट्या बुलढाणा जिल्ह्यातून 150 बसेस बुक करण्यात आल्या आहेत. याचा फटका प्रवासी, पासधारक विद्यार्थी, चाकरमाने यांना बसला आहे. लोकांचे अतोनात हाल होत आहेत. मोदींची सभा म्हणजे प्रवाशांसाठी प्रचंड वैतागवाडी ठरली असून, प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. त्यातच आता परीक्षा सुरू असल्याने उद्या बसअभावी विद्यार्थी, विद्यार्थिनींचे पुन्हा हाल होणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
उद्धव ठाकरेंनी सांगितला बंद खोलीतला 'तो' प्रसंग... | Buldhana Sabha |

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडत आहे. राज्य सरकार ही सभा यशस्वी करण्यासाठी धडपड करत असून, यासाठी एसटी महामंडळ कामाला लावले असल्याचे दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातून विविध आगारांच्या दीडशेच्या आसपास बसेस बुक केल्या गेल्याची माहिती एस. टी. प्रशासनाने दिली.

या बसेस काल (ता. 27) रात्री यवतमाळला रवानादेखील झाल्या. त्यामुळे हजारो विद्यार्थी, नोकरदार तसेच प्रवासी पासधारकांचीही एकच त्रेधातिरपीट उडाली. यावेळी खासगी वाहनचालकांनी प्रवाशांची चांगलीच लूट केल्याचे लोकांनी सांगितले. आता परीक्षेचे दिवस असल्याने पालक व विद्यार्थ्यांतून तीव्र संताप व्यक्त करीत आहे.

या सभेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आगाराला ७६ बसेस असून, त्यांपैकी २५ बसेस यवतमाळला गेल्या, खामगाव आगाराच्या ५६ पैकी ३० बसेस, शेगाव आगाराच्या ४० पैकी १८ बसेस, चिखली आगाराच्या ४६ पैकी २२ बसेस, जळगाव जामोद आगाराच्या ४६ पैकी १८ बसेस, तसेच बुलढाणा आगाराच्या ६६ पैकी २६ व मलकापूर आगाराच्या ५० पैकी २० बसेस यवतमाळला रवाना करण्यात आल्या. मेहकर डेपोवर लोणार व सिंदखेडराजा तर चिखली डेपोवर देऊळगावराजा तालुक्याचा अतिरिक्त भार आहे. या आगारांच्याही प्रत्येकी २० ते २५ बसेस यवतमाळसाठी सोडण्यात आल्या. यामध्ये आजचा दिवस हा हजारो प्रवाशांसाठी प्रचंड मनस्ताप, तारांबळ व वैतागवाडी ठरणारा उजाडला.

Edited By : Atul Mehere

Narendra Modi
Buldhana News : लाचेची रक्कम घेऊन मनसैनिक पोहोचले कार्यालयात !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com