Balwant Wankhede: काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले; मविआ-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

Mahavikas Aaghadi Vs Mahayuti: खासदार वानखेडे यांचे बॅनर फाडल्याचे समजताच ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राजकमल चौकात धाव घेतली. ठाकरे गटाचे नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला.
Mahavikas Aaghadi Vs Mahayuti
Mahavikas Aaghadi Vs MahayutiSarkarnama

Amravati News: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा (PM Narendra Modi oath ceremony) पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर रविवारी देशभर भाजपकडून आनंद साजरा करण्यात आला.

याचवेळी अमरावतीमध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे (MP Balwant Wankhede) यांच्या अभिनंदनाचे लावलेले बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली.

अमरावतीच्या राजकमल चौकात रविवारी रात्री हा प्रकार घडला. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी मध्यस्थी करुन भाजप आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांना शांत केले. आता परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

खासदार वानखेडे यांचे बॅनर फाडल्याचे समजताच ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राजकमल चौकात धाव घेतली. ठाकरे गटाचे नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. त्यांनी राजकमल चौकात ठिय्या आंदोलन करीत झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांना जाब विचारला.

Mahavikas Aaghadi Vs Mahayuti
Raosaheb Danve: लावू का अण्णांना फोन! रावसाहेब दानवेंना विरोधकांनी दाखवला आरसा

वानखेडे यांचे बॅनर फाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली. रात्री उशिरापर्यंत सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. भाजपने व इतर पक्षाने लावलेले बॅनर रात्री पोलिस व महापालिका प्रशासनाने काढले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला. निवडणूक निकाल लागून पाच दिवस झाले असताना रविवारी रात्री खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर-फाडण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com