Narendra Modi Video : निवडणुकीचे रणशिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फुंकले; काँग्रेस, महाविकास आघाडीला धू धू धुतले

Narendra Modi Criticized Congress Pohara devi program : काँग्रेस मागासवर्गीय, दलित, आदिवासी यांना आपल्या बरोबरीची मानत नाही. महाविकास आघाडी आणि काँग्रेसची बंजारा समाजाच्या बाबत वृत्ती चांगला नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरा देवी येथे बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत ए बंजारा वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले. तसेच विकास प्रकल्पांचे लोकापर्ण, उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यास वेळ असला तरी विकास कामांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका करत प्रचाराचे रणशिंग फुंकले.

काँग्रेसपासून सावध राहा त्यांना गरीबाला अजून गरीब करायचे आहे. हा देश फक्त एकाच परिवारचा आहे, असे त्यांना वाटते. असा जोरदार हल्ला मोदींनी काँग्रेसवर चढवला.

काँग्रेस परिवाराला इंग्रजांनी येथे बसवले आहे. काँग्रेस मागासवर्गीय, दलित, आदिवासी यांना आपल्या बरोबरीची मानत नाही. महाविकास आघाडी आणि काँग्रेसची बंजारा समाजाबाबत वृत्ती चांगली नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पोहरादेवीच्या विकासासाठी निधी दिला. महाविकास आघाडीच्या काळात ते काम बंद पाडण्यात आले. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तेव्हा हे काम पुन्हा सुरू करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Narendra Modi
Sharad Pawar : मनोज जरागेंचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात शरद पवारांची खास रणनीती

काँग्रेस फक्त लुटते

काँग्रेसला फक्त लूट करायची आहे. त्यांना गरीबाला गरीब ठेवायचे आहे. आज काँग्रेस अर्बन नक्षल चालवत आहेत. भारतात पुढे जाण्यापासून जे रोखत आहेत ते काँग्रेसचे एकदम खास, जवळचे आहेत. दिल्लीत हजारो कोटींचा ड्रग्ज पकडला गेला. या ड्रग्ज रॅकेटचा प्रमुख काँग्रेसचा नेता निघाला. यांना तरुणांना नशेच्या आहारी घालवायचे आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहायचे आहे, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेस खोट्या घोषणा करते

केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत पाठवत होती. महाविकास आघाडी सरकार कंत्राटदार नेमत ती वाटून खात होती. शेतकऱ्यांना योजना बंद करण्याचा महाविकास आघाडीचे धोरण होते. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आले. त्यांनी जे आश्वासन दिले ते पाळले नाही. काँग्रेस खोट्या घोषणा देत सत्तेत येते.

तेलंगणामध्ये त्यांनी कर्जमाफी घोषणा केली पण कर्जमाफी केली नाही. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात देखील सिंचनाचे प्रकल्प रोखले पण महायुतीने या विकासकामांना गती दिली.

Narendra Modi
Mahayuti News : सत्तार म्हणतात भाजपचा सुपडासाप करू, तर प्रदीप जयस्वालांकडून पाडापाडी ची भाषा ; शिवसेनेचे नेते आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com