Ravi Rana-Navneet Rana यांच्या कृषी महोत्सवावर पोलिसांची कारवाई; राजकीय नेत्यांचे बॅनर हटवले

Ravi Rana-Navneet Rana : बॅनर हटवल्याने आमदार रवी राणा भडकले
Ravi Rana and Navneet Rana
Ravi Rana and Navneet RanaSarkarnama

Ravi Rana and Navneet Rana : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवामध्ये राजकीय नेत्यांचे बॅनर लावण्यात आले होते. पण पोलिसांच्या उपस्थितीत हे बॅनर हटवण्यात आले. त्यामुळे आमदार रवी राणा चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.

अमरावतीमधील सायन्स कोअर मैदानावर हे कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवामध्ये काही राजकीय नेत्यांचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, सध्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचार संहिता सुरू आहे. त्यामुळे आचार संहितेचा भंग होत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांच्या उपस्थितीत हे बॅनर हटवण्यात आले.

Ravi Rana and Navneet Rana
Shirdi Bus accident; चालकाने प्रवाश्यांचे ऐकले असते तर दहा जीव वाचले असते!

हा कृषी महोत्सव बंद करा अन्यथा पोलीस बंदोबस्तात कारवाई करू, असा इशारा अमरावती जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिला. मात्र, कृषी प्रदर्शन हे बंद होणार नाही तर सुरूच राहणार आहे, अशी भूमिका रवी राणांनी घेतली. त्यामुळे राणा आणि प्रशासन काही वेळासाठी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

Ravi Rana and Navneet Rana
Old Pension Scheme : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

युवा स्वाभिमान पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अमरावतीमध्ये कृषी महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पण या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह आणखी काही राजकीय नेत्याचे बॅनर लावण्यात आले होते.

Ravi Rana and Navneet Rana
Eknath Shinde News : "मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द पाळला" : सीमाभागातील कार्यकर्त्यांनी केला सत्कार!

मात्र, अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी सध्या आचारसंहिता सुरू असल्याने राजकीय नेत्याचे बॅनर लावता येत नाहीत. तरी देखील येथे राजकीय नेत्याचे बॅनर लावण्यात आले होते. प्रशासनाने या कार्यक्रमातील बॅनर्स तात्काळ काढले. तर हे काँग्रेसचे (Congress) षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी युवा स्वाभिमान पक्षाने केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com