अकोला: चोरीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने अकोल्यातील (Akola) स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर अश्लील छळ (Sexual Harassment) केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणामुळे अकोल्यात एकच खळबळ उडाली होती. पीडित आरोपी हा शेगावमधील सराफा व्यापारी आहे. दरम्यान या प्रकरणातील पोलीस कर्मचारी असलेल्या शक्ती कांबळे याने त्या व्यापाऱ्याची माफी मागतानाचा सीसीटीव्ही समोर आला. (akola crime news latest update)
अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेत सराफा व्यापारी असलेल्या आरोपीवर अश्लील छळ करून मारहाण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. या प्रकरणामुळे अकोल्यातील पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सहायक पोलिस निरीक्षकास तसेच तर काल शक्ती कांबळे या पोलिस कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान ज्या कर्मचाऱ्यावर आरोप होते त्या कर्मचाऱ्याने त्या पीडित सराफा व्यावसायिकांची माफी मागितली आहे. याचा सीसीटीव्ही सध्या समोर आला आहे. 18 तारखेचा सीसीटीव्ही असून अकोल्यातील त्या पीडित सराफाच्या नातेवाईकाच्या घरी जाऊन माफी मगितल्याचा हा व्हिडीओ आहे. शक्ती कांबळे अस त्या पोलिसांचे नाव असून त्याला सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी निलंबित केले आहे.
काय आहे प्रकरण?
अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी ९ जानेवारीला शेगावातील संबंधित पिडीत सराफाला चोरीचं सोनं खरेदी केल्याप्रकरणी अटक केली होती. सराफाला शेगाववरून अकोल्याला आणताना पोलिसांनी त्याला गाडीतच प्रचंड मारहाण केली. त्यानंतर रविवारी जिल्हा न्यायालयाने संबंधित सराफाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या दोन दिवसांच्या कालावधीत पोलीस निरीक्षक चव्हाण आणि पोलीस शिपाई कांबळे यानी बेदम मारहाण केल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे. इतकेच नव्हे तर संबंधित सराफा व्यापाऱ्यावर पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणात सराफाला जामीन मिळाल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मात्र फिर्याद दाखल करुनही पोलिसांकडून कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. आरोपी पोलिसांविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.