माजी मुख्यमंत्री म्हणाले, मला मंत्री नाही तर आता फक्त आमदार व्हायचंय!

पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) गोव्यात (Goa) राजकारण तापले आहे.
Narendra Modi and Laxmikant Parsekar
Narendra Modi and Laxmikant Parsekar
Published on
Updated on

पणजी : गोव्यात (Goa) पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकारण पेटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी पक्षाला रामराम केला आहे. आता ते पक्षाच्या विरोधातच मैदानात उतरले असून, यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पार्सेकर हे भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख होते. ते भाजपच्या कोअर कमिटीचेही सदस्य होते. भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जाणारे पार्सेकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर पार्सेकर हे 2014 ते 2017 या काळात मुख्यमंत्री होते. ते पर्रीकरांचे विश्वासू व निकटवर्तीय मानले जात. पार्सेकरांना भाजपने तिकिट नाकारले होते. पार्सेकर यांच्या जागी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पार्सेकर यांनी मांद्रेममधून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता पक्षाच्या विरोधातच मैदानात उतरले आहेत. पार्सेकर यांनी म्हटले आहे की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला मंत्री अथवा मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला आमदार व्हायचे आहे. मतदारसंघातील प्रलंबित कामे मला पूर्ण करायची आहेत. मी अपक्ष म्हणून मांद्रेममधून लढणार आहे.

दयानंद सोपटे हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी 2017 मध्ये मांद्रेममधून काँग्रेसच्या तिकिटावर लढून पार्सेकरांचा पराभव केला होता. नंतर काँग्रेसच्या इतर नऊ नेत्यांसोबत ते भाजपमध्ये दाखल झाले होते. आता पार्सेकरांना डावलून भाजपने सोपटेंना संधी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या पार्सेकरांनी थेट पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. सोपटे मतदारसंघातील मूळ भाजप कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप पार्सेकरांनी केला आहे. यामुळे मतदारसंघात सोपटे यांच्याबद्दल मोठी नाराजी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Narendra Modi and Laxmikant Parsekar
अधिकाऱ्यांना कोंडून मारणाऱ्या केंद्रीय मंत्र्यानं दाखवलं राज्य सरकारकडं बोट!

गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपची 34 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) तिकिट भाजपने कापले. त्यामुळे उत्पल यांनी भाजपला रामराम करून पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता लगेचच पार्सेकरांच्या रुपाने भाजपला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.

Narendra Modi and Laxmikant Parsekar
राणेंनंतर मोदी सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत; कधीही होऊ शकते अटक

फडणवीस यांनी गोव्यातील भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना भाजपने तिकिट दिले आहे. यामुळे उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांनी मोठा निर्णय घेत भाजप सोडली आहे. त्यांनी भाजपला धक्का दिला आहे. मात्र, इतर कोणताही पक्षाकडून लढण्याची ऑफर न स्वीकारता ते अपक्ष लढणार आहेत. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Goa Political News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com