Police Department News : आता तृतीयपंथी होवू शकणार पीएसआय, गृहविभागाने केली नियमांत सुधारणा !

Maharashtra : गृह विभागाकडून सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्यात आली आहे.
Police
PoliceSarkarnama

The state government has fixed the criteria for them in service entry : तृतीयपंथी म्हणजे पुढारलेल्या समाजाकडून हिणवला जाणारा एक वर्ग. आतापर्यंत त्यांच्या नशीबी नेहमी अपमानाचे जगणे आले आहे. पण मागील काही काळापासून तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मोठे काम केले आहे. त्यात गृहविभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. (The Home Department has taken a step forward)

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची भाषा नेहमी केली जाते. तृतीय पंथींना पोलिस उप निरीक्षक (पीएसआय) होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने सेवाप्रवेशात त्यांच्यासाठी निकष निश्चित केले आहे. गृह विभागाकडून सेवाप्रवेश नियमात सुधारणा केली आहे.

शासकीय सेवेत भरतीसाठी महिला व पुरुष अशा दोन वर्ग होते. त्यामुळे तृतीय पंथींना शासकीय सेवेत प्रवेशासाठी मोठी अडचण ठरत होती. आता शासनाने तृतीय पंथींना पोलिस सेवेत घेण्याचाही निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रियेत तशी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तृथीय पंथींमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्यासाठी निकष निश्चित करण्यात आले नसल्याने प्रत्यक्ष भरतीप्रक्रिया राबवण्यास अडचण येत होती.

आता शासनाने (State Government) त्यांच्या सेवाप्रवेशासाठी निकष निश्चित केले आहे. पोलिस (Police) उप निरीक्षक (सेवाप्रवेश) नियमात सुधारणा केली आहे. २२ जून रोजी गृह विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आलेत. हे निकष पूर्ण करणाऱ्यास सेवेत संधी मिळणार आहे. या निकृषानुसार तृतीय पंथींना पुरुष, स्त्री किंवा तृतीय पंथी अशी ओखळ निश्चित करावी लागणार आहे.

Police
Video Recording in Police Station: पोलीस ठाण्यात 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' गुन्हा आहे का? पोलीस आयुक्तांनीच दिलं उत्तर, म्हणाले...

महिला किंवा तृतीय पंथी अशी नोंद केल्यास सूट..
अर्ज करताना तृतीय पंथींना महिला, पुरूष किंवा तृतीय पंथी अशी ओळख निश्चित करावी लागणार आहे. महिला किंवा तृतीय पंथी म्हणून ओळख दाखवल्यास त्यांना शारीरिक चाचणीत सूट मिळेल. उंचीसाठी महिला वर्गाप्रमाणे १५७ सेंटीमीटरचे निकष लागू होतील.

पुरुष म्हणून ओळख दाखवल्यास त्यांना पुरुषांप्रमाणे उंचीकरिता १६५ सेंटीमीटरचे निकष लागू होतील. तृतीय पंथींनी स्वतःची ओखळ पुरुष दाखवली तरी शारीरिक चाचणीत छात्रीचे निकष महिलांप्रमाणेच असणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com