Video Purushottam Puttewar Murder: सासऱ्याची हत्या, गुढ वाढलं; अर्चना पुट्टेवारला मदत करणारी ती राजकीय व्यक्ती कोण?

Nagpur Hit And Run Murder Purushottam Puttewar leader Name In Case Archana Puttewar Supari Killing:अर्चना पुट्टेवारची पर्सनल सेक्रेटरी आणि या हत्या प्रकरणात आरोपी असलेली पायल नागेश्वरच्या माहितीनंतर पोलिसांनी मोबाईल फोन जप्त केला आहे.
Nagpur Hit And Run
Nagpur Hit And RunSarkarnama
Published on
Updated on

गडचिरोली येथील नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवार हीने नागपुरात आपल्या सासर्‍याला सुपारी देऊन मारल्याच्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. अर्चना पुट्टेवार आणि प्रशांत पार्लेवर यांना या कटात एका नेत्याने मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे.

गडचिरोली येथील देसाईगंज येथील नेता या प्रकरणात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. हा नेता या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणत असल्याची माहिती समोर येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींशी सलोखा ठेवत जिल्ह्यात चक्क खाण खरेदी करण्याचा अर्चना पुट्टेवार यांचा इरादा होता. नागपुरात पोलिसांनी हत्येप्रकरणी अर्चना, त्यांचा भाऊ व कटात सहभागी लोकांना अटक केली आहे. आज आरोपींची समोरासमोर विचारपूस होणार आहे.

या प्रकरणात गडचिरोली जिल्ह्यातील काही भूमाफीयांशी पुट्टेवार यांचे हितसंबंध असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक असताना राजकीय पार्श्वभूमी असलेल्या काही भूमाफीयांना त्यांनी विशेष नफा मिळवून दिल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

नागपूरच्या मानेवाडा चौकाजवळ 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार (Purushottam Puttewar) यांचा कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अर्चना पुट्टेवार ही गडचिरोली नगर रचना विभागाच्या सहायक संचालिका आहे. तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार हा सुक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक आहे.

Nagpur Hit And Run
Video Chhagan Bhujbal: भुजबळांना विधानसभेची लईच घाई; लहान भाऊ, मोठा भाऊ कोण ते लवकर ठरवा!

या दोघांनी कट रचून सुपारी देत पुरुषोत्तम यांची हत्या केल्याचा आरोप आहे. कोट्यवधींचे मालक असेलेले पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना आणि मुलगी योगिता आहे.

अर्चना पुट्टेवारची पर्सनल सेक्रेटरी आणि या हत्या प्रकरणात आरोपी असलेली पायल नागेश्वरच्या माहितीनंतर पोलिसांनी मोबाईल फोन जप्त केला आहे.या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून नागपूर पोलिसांनी अर्चना पुट्टेवार यांना अटक केली.

तेव्हापासूनच अर्चना पुट्टेवारनं आपला मोबाईल फोन गायब केला. अनेक प्रयत्न करुनही पोलिसांना अर्चना पुट्टेवाराचा मोबाईल फोन मिळून आला नाही. मात्र, अर्चना पुट्टेवारचा मोबाईल फोन पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात फोनमधील रेकॉर्डच्या आधारे अत्यंत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com