Video Chhagan Bhujbal: भुजबळांना विधानसभेची लईच घाई; लहान भाऊ, मोठा भाऊ कोण ते लवकर ठरवा!

NCP Leader Chhagan Bhujbal on Assembly Election mahayuti issue of seat allocation: "मला खासदार व्हायची इच्छा आहेच. मी नाशिकमधून निवडणूक लढवण्यास तयार होतो. दिल्लीतून माझं तिकीट फायनल केलं होतं.पण...
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांचे लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचेही तिकीट कापले गेले. विधानसभेला हे (Assembly Election) टाळण्यासाठी त्यांनी आत्ताच महायुतीच्या नेत्यांना तिकीट वाटप करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भुजबळांना (Chhagan Bhujbal) विधानसभा निवडणुकीची घाई झाल्याचे दिसते.

"महायुतीतल्या घटक पक्षांनी एकत्र बसून लवकरात लवकर तिकीट वाटपाचा प्रश्न सोडवावा. लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ काय ठरवायचं आहे, ते लवकर ठरवा. शरद पवारसाहेब कामाला लागले आहेत. प्रचार सुरू झाला. तशा प्रचाराला सुरुवात करावी लागली. आपण तेच तेच करत बसलो चर्चेचं गुऱ्हाळ करीत बसलो तर अडचणीत येऊ," अशी शंका भुजबळांनी व्यक्त केली.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळाचे नाव चर्चेत होतं, त्यांनी आदल्या दिवशी माघार घेतली. येथून शिवसेनेचे वि्द्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी देण्यात आली. ते पराभूत झाले.

नाशिक लोकसभेसाठी माझ्या नावाची शिफारस अमित शाह यांनी केली होती. पण नाव जाहीर करण्यात उशीर होत असल्याने प्रचाराला वेळ मिळणार नाही. परिणामी उमेदवारीच्या शर्यतीतूनच माघार घेतली, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. त्याच्याजागी हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. असा गोंधळ विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून भुजबळांनी आत्ताच तिकिट वाटप जाहीर करा, असं महायुतीतील नेत्यांना सांगितलं आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Upset In NCP : छगन भुजबळांना राज्यसभेवर न पाठविण्याचे मुश्रीफांनी फोडले गुपित

नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार का घ्यावी लागली यावर ते म्हणाले, "मी नाराज नाही. मला खासदार व्हायची इच्छा आहेच. म्हणूनच मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकीट फायनल केलं होतं. मला सांगण्यात आलं होतं म्हणून मी कामाला लागलो होतो. पण, एक महिना याबाबत काहीच जाहीर करण्यात आलं नाही. हा अपमान नको म्हणून मी माघार घेतली,"

भुजबळ म्हणाले, "बारा-पंधरा दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली. अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी उमेदवार जाहीर झाला. त्याचे परिणाम आपल्याला दिसले. पक्ष म्हटला की सगळं आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. काहीवेळा थांबावं लागतं. आपल्याला वाटतं असं व्हायला पाहिजे, पण असं मनासारखं होत नाही. नशिबाचा काही भाग असतो, त्यामुळे काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com