Akola Police Transfers News: अकोला जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या; अनेकांना लॉटरी, तर काहींना अद्यापही प्रतीक्षा…

Maharashtra Police Transfers: शहरात येण्यास उत्सुक असलेल्या अनेकांची यात लॉटरी लागली.
Police
PoliceSarkarnama
Published on
Updated on

The opportunity to work was given by District Superintendent of Police Sandeep Ghuge : अकोला जिल्हा पोलिस दलातील प्रशासकीय बदल्या काल (ता. ८) करण्यात आल्या. रात्री उशिरा बदल्यांचा आदेश आला. ग्रामीणमधून शहरात आणि शहरातून ग्रामीणमध्ये कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीणमधून शहरात येण्यास उत्सुक असलेल्या अनेकांची यात लॉटरी लागली तर काहींच्या वाट्याला अद्यापही प्रतीक्षा आली आहे. (Some still have to wait)

शहरातील अनेक कर्मचाऱ्यांना ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये काम करण्याची संधी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. संदीप घुगे यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर प्रथमच पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय (administrative) बदल्या केल्या. एकाच वेळी २०२ कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश काल रात्री निघाले. यात अनेकांना शहरातून ग्रामीणमध्ये तर ग्रामीणमधून शहरात बदली देण्यात आली आहे.

संदीप घुगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच प्रशासकीय स्तरावर मोठा निर्णय घेत बदल्या करताना कोणताही वाद उद्‍भवू नये याची काळजी घेतली आहे. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा विहित कालावधी पूर्ण झाला व ते बदलीस पात्र होते अशाच कर्मचाऱ्यांचा सर्वसाधारण बदलीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

वाहतूक शाखेचे एएसआय विलास पांडे यांना बोरगाव मंजू पोलिस स्टेशन येथे बदली देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पोलिस मुख्यालयातील एएसआय सागर बंडू देशमुख यांना वाहतूक शाखेत नियुक्ती देण्यात आली. याशिवाय पोलिस हेडकॉन्स्टेबल, पोलिस नाईक, पोलिस कॉन्स्टेबल व महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही या २०२ बदली झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे. गतवर्षी म्हणजे २०२२ च्या उन्हाळ्यात तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी केलेल्या बदल्यांमधील ११ कर्मचारी अद्यापही कार्यमुक्त झाले नव्हते. त्यांना तब्बल वर्षभरानंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.

Police
Akola District News : अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी ‘या’ खासदार पुत्रावर !

मर्जीतील कर्मचाऱ्यांना करत नाही कार्यमुक्त..

प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या सर्वसाधारण बदल्यांमुळे अनेक पोलिस (Police) स्टेशनच्या कारभारावर परिणाम होतो. त्यामुळे मर्जीतील पोलिस कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास संबंधित ठाणेदार टाळाटाळ करताना आढळून येतात.

यावेळी मात्र अकोला (Akola) पोलिस अधीक्षकांना बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करून तसा पूर्तता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार किती कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त केले जाते, याकडे पोलिस विभागाचे लक्ष लागले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com