BJP News : भाजपचे पूर्व विदर्भातील दिग्गज नेता, ओबीसी समाजाचा चेहरा आणि माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी जोरदाररीत्या साजरा केला. गोंदियात डॉ. फुकेंचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन यावेळी बघायला मिळाले. अभूतपूर्व अशी होर्डिंगबाजी नागपूर, भंडारा, गोंदियात करण्यात आली. तीनही जिल्ह्यांतील भाजपचे सर्व गट यावेळी एकवटले होते.
गोंदिया जिल्ह्यात सर्वच पक्षात अंतर्गत गटबाजी आहे. काही पक्षात उघड आहे, तर काहीत छुप्या पद्धतीने. भाजपही त्याला अपवाद नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी अनेक जण दावेदारी करीत आहेत. अशातच गोंदियाचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
गोंदियाच्या अलिकडच्या काळातील इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाला एवढी होर्डिंगबाजी झाली आहे. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गटबाजी बाजूला सारून डॉ. फुके यांना या होर्डिंग्जमधून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्यानिमित्ताने डॉ. परिणय फुके यांनी चार महिन्यांनंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात गोंदियात डॉ. फुके यांचा वाढदिवस साजरा झाला. होर्डिंगवर शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये भाजपचे प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांचा समावेश होता.
डॉ. फुके यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने केवळ गोंदियाच नव्हे, तर नागपूर आणि भंडाऱ्यातील भाजपही गटतट विसरत एकवटल्याचे बघायला मिळाले. या शक्तिप्रदर्शनामुळे इतर पक्षांतील इच्छुकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. लोकसभेची निवडणूक आता अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. इच्छुकांनी तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींकडे शिफारस सुरू केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे, गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके हे पहिल्या फळीत तिकिटासाठी दावेदार आहेत. अद्याप कोणत्याही पक्षाकडून जागावाटप झालेले नाही. त्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांनी आपाली तयारी सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचेही दौरे वाढले आहेत. सध्या सर्वच पक्षांनी स्वबळाची तयारी दाखविली आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरसपूर्ण होणार आहे.
भाजपचे डॉ. परिणय फुके यांच्या जनसंपर्काचा वेग वाढला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून डॉ. फुके यांची ओळख आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांनी विकासकामांचा धडाका लावला होता. त्यांचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो, असे मानले जात आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.