BJP News : बॅनरबाजीनंतर माजी पालकमंत्र्यांच्या वाढदिवशी सामाजिक उपक्रमांचा धडाका

Bhandara Politics : भाजपच नव्हे इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारीही आलेत एकत्र
Former Minister Dr. Parinay Fuke.
Former Minister Dr. Parinay Fuke.Sarkarnama
Published on
Updated on

Parinay Fuke : भंडाराचे माजी पालकमंत्री तथा भाजपा दिग्गज नेते डॉ. परिणय फुके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या बॅनरबाजीनंतर भंडाऱ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका लावण्यात आला.

डॉ. फुके यांच्या चाहत्यांनी आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमांमध्ये केवळ भाजपचेच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, शिवसेना, यूबीटीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते. त्यामुळे पक्षीय राजकारण बाजूला ठेवत सर्वांना एकत्र आणण्यात डॉ. फुके यांना यश आले आहे. भंडाऱ्यात या उपक्रमांच्या निमित्ताने राजकीय एकोपा बघायला मिळाला. शेतकरी, पोलिस पाटील, गृहरक्षक, रोजगार सेवक, ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला आदींसाठी विविध उपक्रम यावेळी घेण्यात आलेत.

Former Minister Dr. Parinay Fuke.
Gondia : डॉ. परिणय फुके यांचे झळकले बॅनरवर बॅनर; ‘बर्थ-डे सेलिब्रेशन’चा धुव्वा

डॉ. फुके यांनी लाखनी येथे सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला. लक्ष हॉस्पिटल व फुके फॅन्स क्लबने गुरुकुल आयटीआय प्रांगणात रक्तदान शिबिर घेतले. आरोग्य शिबिरही घेण्यात आले. वृद्धाश्रम व अपंग शाळांमध्येही साहित्य वाटप करण्यात आले. पवनी, लाखांदूर येथेही विविध उपक्रम रबविण्यात आलेत.

नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आलेत. या तीनही जिल्ह्यातील राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. फुके यांना यावेळी भेटत शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नीकटवर्तीय असलेले फुके पूर्व विदर्भात भाजपचे दिग्गज नेते तर आहेतच शिवाय ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. फुके व त्यांच्या चाहत्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पहायला मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाढदिवासच्या निमित्ताने डॉ. फुके यांचे बॅनरवर बॅनर नागपूर, भंडारा, गोंदियात झळकले. तीनही जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व गट यावेळी एकवटले. त्यामुळ अनेकांचे डोळे विस्फारले. लोकसभेची निवडणूक आता अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. इच्छुकांनी तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींकडे शिफारस सुरू केली आहे. भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे, गोंदियाचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके हे तिकिटासाठी पहिल्या फळीतील दावेदार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचेही दौरे लोकसभा मतदार संघात वाढले आहेत. सध्या सर्वच पक्षांनी स्वबळाची तयारी दाखविली आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरसपूर्ण होणार हे नक्कीच.

Edited by : Prasannaa Jakate

Former Minister Dr. Parinay Fuke.
Bhandara : नवीन कलम असेल तर फॉरेस्ट अधिकाऱ्यांना आत टाका, असे का म्हणाले गडकरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com