सर्वाधिक मते मिळवणा-या प्रदीपची राज्यभर चर्चा, विरोधी उमेदवारांचा केला सुपडा साफ...

भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara District) लाखनी येथील नगरपंचायत निवडणुकीत (Election) विक्रमी मतांनी विजय मिळवून एका उमेदवाराने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
Pradeep Titirmare, Lakhani, Bhandara
Pradeep Titirmare, Lakhani, BhandaraSarkarnama

लाखनी (जि. भंडारा) : भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara District) लाखनी येथील नगरपंचायत निवडणुकीत (Election) विक्रमी मतांनी विजय मिळवून एका उमेदवाराने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. प्रदीप पुरुषोत्तम तितीरमारे, असे या विजयी उमेदवाराचे नाव आहे.

प्रदीप तितीरमारे वयाच्या 18 व्या वर्षापासून समाजकारणात सक्रिय आहे. प्रभागातील सर्वसामान्य माणसाला अडचणीच्या काळात आधार देण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. रात्री अपरात्री गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी प्रदीप कधीच मागे हटत नाही. त्याच्या याच स्वभावामुळे तो सर्वत्र लोकप्रिय आहे. कोरोना काळात गोरगरिबांना राशनचा पुरवठा असो की त्यांचे विजेचे थकलेले बिल भरण्याचे काम असो प्रदीपने कधीच पैशांचा विचार केला नाही. शेती करून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना प्रदीपने परिसरातील नागरिकांना कुटुंबाप्रमाणेच सांभाळले. म्हणूनच लोकांनी देखील मतांचा आशीर्वाद देत त्याला कुटुंबप्रमुख म्हणून निवडून दिले. गोरगरिबांचा लाडका प्रदीप वयाच्या 34 व्या वर्षी नगरसेवक झाला, तोही राज्यातून सर्वाधिक मते मिळवून.

इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त..

नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क. 9 मधून काँग्रेसच्या तिकिटावर प्रदीप निवडणूक रिंगणात उतरला. प्रदीप निवडणूक लढवणार असल्याचे समजतात कोणताही उमेदवार त्याच्याविरोधात निवडणूक लढवण्याची हिंमत करत नव्हता. कशीबशी इतर दोघांनी हिंमत केली पण त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.

Pradeep Titirmare, Lakhani, Bhandara
भंडारा झेडपी : राष्ट्रवादीचे राजू देशभ्रतार विजयी, तर देहू नगरपंचायतीवर एकहाती सत्ता...

राज्यातील एकमेव उमेदवार..

96.21 टक्के मते घेऊन प्रदीपने एकतर्फी विजय मिळवला. मतदारांनी 475 पैकी 457 मतांचे दान एकट्या प्रदीपच्या पारड्यात टाकले. विरोधातील उमेदवारांना एकाला 9 तर दुस-याला केवळ 5 मते मिळाली. नगरपंचायत निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर मते मिळवणारा प्रदीप राज्यातील एकमेव उमेदवार ठरला आहे.

गत 16 वर्षांपासून सर्वसामान्य व गोरगरिबांची सेवा करत आहे. मी आजवर सर्वांना आपल्या कुटुंबाप्रमाणेच सांभाळले. यापुढे सर्वांची सेवा करत राहणार आहे.

- प्रदीप तितीरमारे, नवनियुक्त नगरसेवक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com