Pawar : प्रफुल्लभाई एक गोष्ट चुकलीच; फुले पगडी घातली असती, तर चांगले झाले असते…

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात पवार (Sharad Pawar) बोलत होते.
Prafull Patel, Chagan Bhujbal and Sharad Pawar
Prafull Patel, Chagan Bhujbal and Sharad PawarSarkarnama

नागपूर : आज ज्या सभागृहात आपण आपल्या एका ज्येष्ठ नेत्याचा वाढदिवस साजरा करत आहोत. त्याच सभागृहात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा झाला होता. त्यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला होता, तो म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भुजबळांच्या कार्याच्या आठवणी ताज्या केल्या.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात पवार (Sharad Pawar) बोलत होते. ते म्हणाले, याच सभागृहात राष्‍ट्रवादीची (NCP) स्थापना झाली. भुजबळांच्याच अध्यक्षतेखाली त्यानंतर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) सभा झाली. प्रचंड सभा त्यावेळी झाली होती. संध्याकाळी शिवाजी पार्कवरील सभेचे अध्यक्षही भुजबळच होते. १ लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते त्यावेळी जमले होते. तेव्हा महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणाला दिशा देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला होता. त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम भुजबळांनी आपल्या खांद्यावर घेतलं होतं. त्याचे स्मरण आज मला याठिकाणी होतेय.

भुजबळांचे कौतुक करताना पवार प्रफुल्ल पटेल यांना उद्देशून म्हणाले, या सत्काराच्या मागे तुमची जबाबदारी जास्त होती, असं कळलं. एक गोष्ट तुमच्याकडून चुकली, ती म्हणजे अशी की, तुम्ही सत्कार केला, पण त्यांच्या डोक्यावर फुले पगडी घातली असती तर अधिक चांगलं झालं असतं. आपण त्यांचा ६०वा वाढदिवस साजरा केला. आज ज्येष्ठ सहकाऱ्याचा ७५वा वाढदिवस साजरा करतो आहोत, याचा आनंद आहे. ते काम करतात आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहतात, हे त्यांच्यातले वैशिष्ट्य आहे, असेही पवार म्हणाले.

विकासाला प्रेरणा देणारा नेते म्हणून आपण त्यांना ओळखतो. शून्यातून व्यक्तिमत्त्व कसं उभं राहतं, याचे जिवंत उदाहरण म्हणजे भुजबळ आहेत. नाशिक जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. नातेवाईक सगळे याच भागातले. व्यवसाय भाजी विक्रीचा. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार लाभला नाही. मावशीच्या वात्सल्यात ते वाढले. तिच्याच आशीर्वादाने ते मोठे झाले. पण त्यासाठी अनेक खस्ता खाव्या लागल्या. भायखळ्याला भाजीचं दुकान चालवावं लागलं. त्यावेळी भाजी विक्रीसाठी जे दुकान होतं, तेसुद्धा कुणाकडून तरी तात्पुरतं घेतलं होतं. काही दिवसांनंतर ते दुकान त्यांच्याकडून काढून घेण्याचे ठरले. असे झाले असते तर कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला असता.

Prafull Patel, Chagan Bhujbal and Sharad Pawar
Shivsena: मशाल चिन्हावर विजयी झालेले छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिले आमदार

तेव्हा दोन लोक त्यांच्या संपर्कात आले एक मुकुंद थकोजी पाटील. पाटील हे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. दुसरे माझ्यासोबत विधानसभेत होते, त्यांचं नाव विरजी झुते. झुते हे त्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉंग्रेसचे नेते होते. जेव्हा भुजबळांवर हे संकट आले, तेव्हा पाटील आणि झुते यांनी मध्यस्थी केली आणि त्यांच्याकडे दुकान साबूत राहिले. त्यानंतर शिक्षण झालं. शिवसेनेचं नेतृत्व त्यांनी केलं. शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून ते निवडून आले. महापौर म्हणून मुंबईचे नेतृत्व त्यांनी केले. त्यानंतर ते विरोधी पक्षनेते राहिले, राज्याच्या मंत्रिमंडळातही काम केले. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. असे उदाहरण राज्यात आगळेच असेल, असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com