Ambedkar On Modi: भीती दाखवण्यासाठी मोदींकडून ED, CBIचा गैरवापर; आंबेडकरांचा आरोप

Akola Lok Sabha Constituency 2024: नवीन मतदार वर्ग बीजेपीकडे वळला होता, या मतदारांचा भ्रमनिराश झाल्यामुळे त्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी प्रचंड घसरली.
Prakash Ambedkar, Narendra Modi
Prakash Ambedkar, Narendra Modisarkarnama

योगेश फरपट

Akola Political News: मोदी सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करीत विरोधकांना कोंडी पकडत आहे, असा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

"मोदींच्या कार्यकाळात लोकशाही ऐवजी पोलिसी राज्य अस्तित्वात असल्याचे दिसत आहे.तपास यंत्रणेचा गैरवापर करून अनेकांना वेठीस धरण्याचे काम या मोदींनी केले. गेल्या दहा वर्षात ईडी (ED) आणि सीबीआयने कारवाई केलेल्या एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही. याचा अर्थ केवळ भीती दाखवण्यासाठी मोदी सरकारने लोकशाहीच्या विरोधात जाऊन सत्तेचा गैरवापर केला असे सिद्ध होते," असे आंबेडकर म्हणाले.

"नवीन मतदार वर्ग बीजेपीकडे वळला होता, या मतदारांचा भ्रमनिराश झाल्यामुळे त्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी प्रचंड घसरली. मोदी सरकारच्या विरोधातील राग व्यक्त करण्यासाठी मतदारांनी सरकारच्या विरोधात मतदान करून आपला हक्क बजावून सरकारचा निषेध करावा," असे आंबेडकर म्हणाले.

शाहू फुले आंबेडकर तसेच मानवतावाद स्वीकारणाऱ्या मतदार वर्गावर आता एक जबाबदारी आली आहे, लोकशाहीच्या नावाखाली जो धिंगाणा मोदींच्या काळात सुरू आहे त्याला कसे थांबवता येईल, यासाठी मतदारांनी जागरूक राहून मतदान करावे.

या सर्व प्रक्रियेसाठी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय असून मतदारांनी निर्भीडपणे वंचित बहुजन आघाडीचा मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रात सत्तेत बसलेल्या मोदी सरकारने दहा वर्षात फक्त टिंगलटवाळी केली आणि मोठ्या प्रमाणात ईडी आणि सीबीआय या यंत्रणेचा गैरवापर केला, असा आरोप त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar, Narendra Modi
Dhananjay Mahadik Vs Satej Patil: सतेज पाटलांना दंगल घडवायची आहे का? धनंजय महाडिक यांचा रोख....

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी शंकराचार्यांनी तूर्तास विरोध केला होता, मात्र निवडणुका तोंडावर असल्यामुळे शुभ मुहूर्त न पाहता त्यांनी घाई घाईने मंदिराचे उद्घाटन करून टाकले. 400 पारचा नारा देऊन त्यांना संविधान बदलायचे आहे हे स्पष्ट दिसते, असे आंबेडकर म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com