Prakash Ambedkar : जातीव्यवस्थेतील पुजारीपणाला आंबेडकरांचे आव्हान; म्हणाले...

Prakash Ambedkar News : 'अठरापगड जातीतील पुजारी का नाही?'
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

गोंडपिपरी : आपल्या व्यवस्थेत जातीनिहाय पुजारी ठेवण्याची व्यवस्था आहे. पण ती केवळ एका जातीपुरती आहे. अठरापगड जातीतील प्रत्येक जातीत पुजारी आहेत. पण त्यांचे पुजारीपण नाकारले जाते. यामुळे जात पुजारी ही व्यवस्था बंद करून अठरापगड जातीतील पुजाऱ्यांना पुजारीपणाची संधी द्यायला हवी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मांडले.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरीमध्ये तालुका बौध्द महासभेच्यावतीने आज धम्म मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकरांनी पुढे बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. ते म्हणाले, ''संघाला पर्यायाने सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना सरसकट जेलमध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात आलीय. ही वृत्ती अतिशय घातक आहे. याला प्रतित्तर देण्यासाठी आपल्याला सतर्क रहावं लागणार आहे.''

''नोटबंदी हे देशावरचं मोठं संकट होतं. हे आता स्पष्ट झालंय. कारण नोटाबंदीचा (Demonetization) अधिकार सरकारला आहे की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला (Reserve Bank of India) असा प्रश्न न्यायालयाने देखील विचारला आहे. त्यामुळे नोटबंदीचा देशाला फायदा झाला की तोटा हा चितंनाचा विषय आहे.''

Prakash Ambedkar
Ramdas Athawale : ठाकरे-आंबेडकर एकत्र; रामदास आठवलेंचं मोठं चॅलेंज

''या देशातील शिक्षण व्यवस्थेवर सत्ताधाऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे. दर पाच वर्षांनी शिक्षणाचे पॅटर्न बदलले जातात. यामुळे येणारी पिढी पोखरत चालली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेण्याची गरज'' असल्याचं ते म्हणाले.

''सध्या देशातील चार मोठ्या उद्योगपतींना मालदार करण्याचं काम सुरु आहे. उद्योगपतींना मोठं करणं आणि गरीबांना गरीब करणं हे धोक्याचं आहे. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची लोकशाही (Democracy) या देशात रुजवण्याची गरज आहे'', असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com