‘आमदार भारसाकळे, मिटकरीसाहेब त्या प्रकल्पांचेही श्रेय तुम्हीच घ्या’

तेल्हारा तालुक्यातील चिपी प्रकल्पाचे श्रेय लाटण्याची चढाओढ सध्या जिल्ह्यातील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांमध्ये सुरू आहे.
Amol Mitkari-Prakash Bharasakle
Amol Mitkari-Prakash Bharasakle Sarkarnama

धर्मेश चौधरी

तेल्हारा (जि. अकोला) : अकोला जिल्ह्यातील विकासाच्या बाबतीत सर्वात मागे असलेल्या तेल्हारा तालुक्यातील चिपी प्रकल्पाचे श्रेय लाटण्याची चढाओढ सध्या जिल्ह्यातील भाजप (BJP) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदारांमध्ये सुरू आहे. या प्रकल्पाची चर्चा सुरू असतानाच तालुक्यात मंजूर झालेली भारत बटालियन पळविण्यात आली. गेली चार वर्षांपासून खोदून ठेवलेल्या रस्त्यांचा प्रकल्प मार्ग लागलेला नाही. या प्रकल्पाबाबत आमदार महोदय शब्दही काढायला तयार नाहीत. जसे कामाचे श्रेय घेता, तसे आमदारांनी या तालुक्यातून पळविण्यात आलेल्या प्रकल्पांतील अपयशाचे श्रेयही घ्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (MLA Prakash Bharasakle & Amol Mitkari should take credit for projects that went beyond Telhara taluka)

चिपी प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता मिळविण्यावरून भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे (Prakash Bharasakle) व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात सध्या श्रेय घेण्याचा आटापिटा सुरू आहे. या लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्नावरही तेवढीच आत्मियता का दाखवू नये? वान धरणांमधील तेल्हारा तालुक्यांच्या हक्काचे पाणी अकोला महापालिकेच्या अमृत योजनेकरिता आरक्षित करण्यात आले, तेव्हा आमदार भारसाकळे व आमदार मिटकरी कुठे होते? बाळापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठीसुद्धा याच वान धरणातील पाणी आरक्षित करण्यात आले. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव येथे भारत बटालियन कॅम्प सर्वात आधी मंजूर झाला होता. हा प्रकल्प कोणी पळवून नेला? आमदार या पळवापळवीचीही जबाबदारी घेणार आहेत का?

Amol Mitkari-Prakash Bharasakle
बाबांनो, मी खूप अनुभवलंय...तोलून मापून बोला : अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

तेल्हारा तालुक्यातील जनतेने वानचे पाणी वाचविण्यासाठी फार मोठा लढा दिला. भारत बटालियनसुद्धा तेल्हारा तालुक्यातून जाऊ नये; म्हणून जनता रस्त्यावर उतली होती. जनआंदोलनसुद्धा उभारण्यात आले होते. तरीसुद्धा बटालियन कॅम्प जिल्ह्यातून पळविण्यात आला. तेल्हारा तालुक्यातील जनतेच्या हक्काचे पाणीसुद्धा आमदार वाचवू शकले नाहीत. गेली चार वर्षांपासून तेल्हारा शहरातून तालुक्याच्या चारही बाजूला जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या जीवघेण्या रस्त्यांवर आतापर्यंत अनेकांनी प्राण गमावले आहेत. शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आले. त्याचे ‘श्रेय’ कुणाला, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

Amol Mitkari-Prakash Bharasakle
'शेट्टीसाहेब, आमच्या सरकारला अजूनही तुमचा पाठिंबा आहे, असे आम्ही समजतो...'

आयात नेत्यांच्या पाठीमागे पळण्याची स्थानिक नेत्यांमध्ये शर्यत

तेल्हारा तालुका हा अकोला जिल्हा मुख्यालयापासून सर्वाधिक अंतर असलेला व कायम दुर्लक्षित तालुका राहिला आहे. दळवळणाच्या साधनांचा अभाव असल्याने सुपीक असलेल्या तेल्हारा तालुक्याच्या विकासाचा आलेख कधीही उंचावला नाही. येथील अनेक प्रश्न वर्षानुवर्षांपासून भिजत पडले आहेत. तालुक्यात सक्षम नेतृत्वच तयार झाले नाही. आयात नेत्यांच्या पाठीमागे पळण्याची शर्यत स्थानिक नेत्यांमध्ये लागलेली दिसते. त्यामुळे या तालुक्याचा विकास खुंटला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com